शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात तक्रारकर्त्यालाच सुनावली दोन वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 20:13 IST

जिल्ह्यात २९ वर्षापूर्वी दरोडा प्रकरणात तक्रार करणाऱ्या व्यक्तीने बयान बदलल्यामुळे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी सहदिवाणी न्यायाधीश तिसरे यांनी फितूर झालेल्या तक्रारकर्त्यालाच दोन वर्षाचा सश्रम कारावास सुनावला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याच्या इतिहासात पहिली शिक्षाजिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात २९ वर्षापूर्वी दरोडा प्रकरणात तक्रार करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना दिलेल्या बयानावर कायम न राहता न्यायालयात साक्ष देताना बयान बदलल्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी सहदिवाणी न्यायाधीश तिसरे यांनी फितूर झालेल्या तक्रारकर्त्यालाच दोन वर्षाचा सश्रम कारावास सुनावला आहे. हा महत्वपूर्ण निर्वाळा सोमवारी (दि.१८) रोजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी सहदिवाणी न्यायाधीश तिसरे अ. श्री. जरोदे (उजवणे) यांनी दिला आहे.नरेश जेठानंद मेघवानी (५१) रा. माताटोली गोंदिया असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. सोडा फॅक्ट्री चालविणाºया नरेश मेघवानी यांनी ९ जानेवारी १९८९ ला सायंकाळी ७.३० वाजता सिंधी कॉलनीतील राजू नचमल कहीथी व लक्षमण उर्फ घोडा आकवानी यांनी बळजबरीने ६० रूपये आपल्या जवळून हिसकावून नेले होते अशी तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या आधारावर गोंदिया शहर पोलिसात अपराध क्र.६/८९ चे कलम ३९२,३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने साक्ष घेण्यासाठी नरेश मेघवानी यांना बोलाविले. त्यावेळी मेघवानी यांनी पोलिसांना दिलेले बयान वेगळेच व न्यायालयात सदर बयान बदलले. त्यावेळी हे प्रकरण प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी दुसरे सुधाकर यार्लागड्ड यांच्याकडे होते. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. प्रशांत डोये यांनी नरेश मेघवानीची उलट तपासणी केली होती. त्यात मेघवानी फितूर झाला असे लक्षात आल्यावर न्यायाधीश यार्लागड्ड यांनी स्वत: लक्ष घालून फितूर झालेल्या मेघवानी यांच्याविरूध्दच न्यायालयात खटला चालविला. या खटल्यात अ‍ॅड. प्रशांत डोये, अ‍ॅड. क्रिष्णा पारधी, अ‍ॅड. मुकेश बोरीकर यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले. न्यायालायात दोन साक्षदार तपासण्यात आले. अ‍ॅड. मुकेश बोरीकर यांनी या प्रकरणातील वास्तव व तक्रारकर्ताच कसा फितूर झाला असे न्यायालयाला सांगितल्याने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी सहदिवाणी न्यायाधीश तिसरे अ.श्री. जरोदे (उजवणे) यांनी आरोपीला शिक्षा सुनावली. २ वर्षाचा सश्रम कारावास व ५ हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिन्याचा साधा कारावास सुनावला आहे. तक्रारकर्त्याला खोटी साक्ष देणे महागात पडले असून तक्रारकर्त्यालाच दोन वर्षाची शिक्षा झाल्याचे हे गोंदिया जिल्ह्यातील पहिलेच प्रकरण असल्याचे वकील मंडळींचे म्हणणे आहे.

टॅग्स :Courtन्यायालय