शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात होतेय देशी कट्ट्यांची विक्री ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:27 IST

गोंदिया : गोंदियात संघटित गुन्हेगारी सक्रिय आहे. गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा आरोपींवर मोक्का लावतात. तरी देखील काही टोळ्या ...

गोंदिया : गोंदियात संघटित गुन्हेगारी सक्रिय आहे. गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा आरोपींवर मोक्का लावतात. तरी देखील काही टोळ्या टप्प्याटप्प्याने जन्म घेत आहेत. गोंदिया शहरात मोठ्या प्रमाणात देशी कट्टे वापरणारे लोक आहेत. आपसी वैमनस्यातून एकमेकांचा काटा काढण्यासाठी किंवा एकमेकाला धमकावण्यासाठी या देशी कट्ट्यांचा सर्रास वापर केला जात आहे. मध्यप्रदेश व छत्तीसगड येथून गोंदियात येणाऱ्या या देशी कट्ट्यांच्या गोरखधंद्याला पायबंद घालण्याची गरज आहे.

गोंदिया शहराला काही बड्या लोकांनी मिनी मुंबई म्हणून संबाेधले आहे. या मिनी मुंबई असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात देशी कट्टे वापरले जात आहेत. एखादा गुन्हा घडला तर त्या देशी कट्ट्यांचा विषय पुढे येतो; अन्यथा या देशी कट्ट्यांकडे दुर्लक्ष हाेत आहे. परवाना घेतल्याशिवाय बंदूक वापरता येत नाही. परंतु गोंदियात विनापरवाना मोठ्या प्रमाणात देशी कट्टे वापरले जात आहेत. रेतीमाफियांचा वाद झाला किंवा गँगवार झाला तर यावेळी देशी कट्ट्यांचा वापर होताना दिसत आहे. गोंदिया शहरात दिवसाढवळ्या देशी कट्ट्यांची विक्री होत आहे. याचा प्रत्यय स्वत: गोंदियाच्या पोलिसांना आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून देशी कट्टा विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना रंगेहाथ पकडले होते. एखाद्याचे प्रेम प्रकरण असो किंवा वैमनस्य यात टोकाची भूमिका घेतलेल्या लोकांनी एकमेकांना संपविण्यासाठी देशी कट्ट्याचा वापर केल्याच्या घटना गोंदिया जिल्ह्यात यापूर्वी घडल्या आहेत. या विनापरवाना देशी कट्टा वापरणाऱ्यांवर कारवाई होण्याची गरज आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ज्यांच्याकडून देशी कट्टे जप्त केले, त्यांच्याकडून सखोल चौकशी करण्याची गरज आहे.

बॉक्स

मध्यप्रदेश व छत्तीसगडमधून पुरवठा

देशी कट्ट्यांचा पुरवठा गोंदियात मध्यप्रदेश व छत्तीसगड या दोन राज्यांतून होतो. बिहार आणि उत्तर प्रदेशातूनही देशी कट्टा गोंदियात येत असल्याची माहिती आहे. हे देशी कट्टे २० हजारांपासून तर लाखो रुपये किमतीला विक्री होत असल्याची माहिती आहे. या देशी कट्ट्यांच्या विक्रीला लगाम लावण्याची गरज आहे.

बॉक्स

पोलिसांनी राबवावी धडक मोहीम

अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा काम करते. दारू, जुगार व इतर अवैध धंद्यांना लगाम लावण्यासाठी पोलीस काम करतात. मग जीवघेण्या घटना गोंदियात घडविण्यासाठी विक्री होणाऱ्या देशी कट्ट्यांच्या व्यवसायाला पोलिसांनी आळा घालण्याची गरज आहे. गोंदिया शहरात शेकडो देशी कट्टे विनापरवाना वापरत आहेत. त्यांच्या घराची झडती घेण्यासाठी पोलिसांनी तत्परता दाखवून मोठ्या प्रमाणात असलेले देशी कट्टे जप्त करावेत.