शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया कमाल २९.६ अंश तर किमान १३.९ अंश, दोन्ही तापमानांमध्ये घट, विदर्भात पहिल्याच क्रमांकावर

By कपिल केकत | Updated: November 26, 2023 20:18 IST

गोंदिया कमाल तापमान प्रथम तर किमान तापमान बघता दुसऱ्या क्रमांकावर होता.

गोंदिया : हवामान खात्याने तापमानात घट होऊन थंडीचा जोर वाढणार, असा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार, तापमानात घट दिसून येत असतानाच गोंदियात मात्र कमाल व किमान दोन्ही तापमानांत घट झाली आहे. रविवारी (दि.२६) जिल्ह्याचे कमाल तापमान २९.६ अंश, तर किमान तापमान थेट १३.९ अंशावर आले होते. यानंतर गोंदिया कमाल तापमान प्रथम तर किमान तापमान बघता दुसऱ्या क्रमांकावर होता.

नवरात्रीपासूनच जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. गार वारे वाहू लागल्याने हिवाळ्याची चाहूल लागली होती व गुलाबी थंडीचा आनंद जिल्हावासी घेत होते. त्यात दिवाळीनंतर मात्र खऱ्या अर्थाने हिवाळ्याने एंट्री मारली असून, थंडीचा जोर हळूहळू वाढताना दिसत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंशपर्यंत व किमान तापमान १४ अंशपर्यंत येत होते. त्यानंतर हवामान खात्याने थंडीचा जोर वाढणार, असा अंदाज वर्तविला होता. त्याचे परिणाम रविवारी दिसून आले असून, गोंदिया जिल्ह्याच्या कमाल व किमान तापमानात घट झाली आहे. कमाल तापमान सर्वात कमी २९.६ अंशांवर आले असून किमान तापमान १३.९ अंशांवर आले आहे. येथे गोंदिया दुसऱ्या क्रमांकावर असून यवतमाळचे किमान तापमान १३ अंशांवर आहे.

ढगाळ वातावरणाने थंडी कमी- मध्यंतरी सायंकाळ होताच थंडीचा जोर वाढत होता. मात्र हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला असून, त्यानुसार दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. यामुळे थंडीचा जोर कमी झाल्याचे जाणवत आहे. अशात पाऊस बरसल्यास मात्र थंडीचा जोर वाढणार यात शंका नाही.

सोमवार व मंगळवारी यलो अलर्ट- हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला असून त्यानुसार जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. विशेष म्हणजे, हवामान खात्याने सोमवारी व मंगळवारी जिल्ह्याला यलो अलर्ट दिला असून जिल्हयात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

टॅग्स :Temperatureतापमान