शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडा मुख्याधिकाऱ्यांकडे गोंदिया न.प.चा प्रभार

By admin | Updated: June 21, 2015 01:04 IST

गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुमंत मोरे दीर्घ रजेवर गेले असल्याने त्यांचा प्रभार तिरोडाचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांना देण्यात आला आहे.

शुक्रवारीपासून काम सुरू : ठरावीक दिवस नाहीगोंदिया : गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुमंत मोरे दीर्घ रजेवर गेले असल्याने त्यांचा प्रभार तिरोडाचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांना देण्यात आला आहे. प्रभार देण्यात आला असला तरिही येथील कामकाजावर मात्र प्रभाव पडणार असल्याचे दिसून येत आहे. कारण प्रभारी मुख्याधिकारी आपल्या सवडीनुसार गोंदिया कार्यालयात येणार असल्याचे कळले. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत नागरिकांची कामे रेंगाळणार यात शंका नाही. मुख्याधिकारी मोरे व नगरसेवक शिव शर्मा यांच्यातील वादाने काही दिवस नगर परिषद कार्यालयाचा कारभार बंदच होता. त्यानंतर लगेच नगर परिषद कर्मचारी संघटनेचे नेते छेदीलाल इमलाह यांच्या हत्येनंतर सफाई कामगारांनी नगर परिषदेत तोडफोड केली. त्यामुळे नगर परिषद बंद ठेवण्यात आली होती. हे सर्व प्रकार सुरूच असताना १५ जून पासून मुख्याधिकारी मोरे रजेवर गेले. विशेष म्हणजे त्यांनी रजेचा कालावधी दशर्विलेला नसल्याचे कळले. त्यात पालिकेचा प्रभार गुरूवार (दि.१८) पर्यंत कुणाकडेही देण्यात आलेला नव्हता. शुक्रवारी (दि.१९) प्रभार तिरोडाचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांच्याकडे देण्यात आल्याचे कळले. उरकुडे यांच्याकडे गोंदिया नगर परिषदेचा प्रभार देण्यात आलेला असतानाही येथील कारभार मात्र प्रभावीत झाल्याचेच दिसते. कारण येथील कर्मचारी साहेब नसल्याने आमच्याकडे अधिकार नाही असे कारण पुढे करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यात प्रभारी मुख्याधिकारी उरकुडे सुद्धा कार्यालयात हजर राहणार नाहीत. अशात कर्मचारी त्यांचे कारण पुढे करून हात मोकळे करून घेणार. एकंदर याचा परिणाम कामकाजावर होणार असून नागरिकांची कामे मात्र खोळंबणार यात शँका नाही. तरीही गोंदियावासीयांची कामे खोळंबणारप्रभारी मुख्याधिकारी उरकुडे यांना तिरोडा नगर परिषदेचा कारभार बघून गोंदियाचाही कारभार बघावा लागणार आहे. असे असताना त्यांनी गोंदिया कार्यालयासाठी ठराविक दिवस दिला नाही. शिवाय शुक्रवारी ते गोंदिया कार्यालयात दोन तास बसले होते असे कळले. अशात त्यांच्या अनुपस्थितीत मात्र नागरिकांची कामे खोळंबणार यात शंका नाही. शिवाय मुख्याधिकारी नसल्याने कर्मचारीही मनमर्जीने कारभार करणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही. बहुतांश कर्मचाऱ्यांची इलेक्शन ड्युटी येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी पालिकेतील बहुतांश क र्मचाऱ्यांची इलेक्शन ड्युटी लावण्यात आली आहे. अगोदरच बिएलओचे काम देण्यात आलेले असताना आता इलेक्शन ड्युटी लावण्यात आल्याने कर्मचाऱ्यांत नाराजीही दिसून आली. मात्र उपाय नसल्याने कर्मचारी मनमारून कामे करीत आहेत. इलेक्शनच्या या ड्युटीमुळे मात्र कर्मचारी जागेवर उपलब्ध राहत नाहीत. त्याचाही परिणाम कामकाजावर पडत असून नागरिकांची कामे खोळंबतात.