शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

विकासाच्या व्हिजनअभावी गोंदिया माघारले

By admin | Updated: February 8, 2017 00:55 IST

विकासाची खरी व्याख्या काय आहे, हे गेल्या अनेक वर्षात राज्यकर्त्यांनी गोंदियावासीयांना कळूच दिले नाही.

पालकमंत्र्यांचा ठपका : दूरदृष्टी ठेवून कामे करण्याचा नवीन नगराध्यक्ष व सदस्यांना सल्ला गोंदिया : विकासाची खरी व्याख्या काय आहे, हे गेल्या अनेक वर्षात राज्यकर्त्यांनी गोंदियावासीयांना कळूच दिले नाही. केवळ विकासाची स्वप्नं दाखविली पण खऱ्या अर्थाने विकास झालाच नाही. विकासाचे व्हिजन नसल्यामुळे गोंदिया या बाबतीत माघारले आहे; मात्र आता गोंदियावासीयांनी भाजपच्या हाती नगर परिषदेची पूर्ण सत्ता दिली. त्यामुळे पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली नागरिकांना खरा विकास दाखविण्यासाठी पुढील २० वर्षांचा विचार करून कामे करावी लागतील, असा मोलाचा सल्ला पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिला. नगर परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ मंगळवारपासून (दि.७) सुरू झाला. यानिमित्त भाजपाच्या वतीने न.प.च्या हिंदी टाऊन स्कूलच्या प्रांगणात आयोजित नवीन नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या पदग्रहण आणि आभार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ना.बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले होते. यावेळी मंचावर अतिथी म्हणून आ.विजय रहांगडाले, माजी खा.डॉ.खुशाल बोपचे, माजी आ.केशवराव मानकर, खोमेश्वर रहांगडाले, भजनदास वैद्य, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे, मावळते नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, बालाघाटच्या भाजप नेत्या मौसम हरीणखेडे, जि.प. सभापती छाया दसरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम, माजी नगराध्यक्ष सविता इसरका, नवनिर्वाचित गटनेता घनश्याम पाणतावने, बालाघाटचे नगराध्यक्ष अनिल धुवारे, जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, शहर महामंत्री दीपक कदम आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी ना.बडोले म्हणाले, नगराध्यक्ष अशोक इंगळे यांना गोंदियावासीयांनी संधी दिली. जनतेचा हा विश्वास ते पुढील पाच वर्षात निश्तिच सार्थकी लावतील. शहराच्या विकासात्मक कामांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री म्हणून मी स्वत: या शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वास बडोले यांनी व्यक्त केला. आ.विजय रहांगडाले यांनी आपल्या मार्गदर्शनात केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असताना आता नगर परिषदही भाजपच्या हातात आली आहे. त्यामुळे विकास कामे करण्याची जबाबदारी वाढली असून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून न.प.साठी जास्त निधी देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. मावळते नगराध्यक्ष कशिस जयस्वाल यांनी अडिच वर्षाच्या कार्यकाळात अनेक अडथळे पार करीत विकास कामे मार्गी लावल्याचे सांगितले. भाजपचे न.प.निवडणूक प्रभारी विनोद अग्रवाल यांनी पक्षाने यावेळी आणि गेल्यावेळीही नगर परिषद निवडणुकीची सोपविलेली जबाबदारी पार पाडताना प्रथमच भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक आणि आता नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी सर्वांच्या सहकार्यातून प्रयत्न केले. यामुळे प्रलंबित राहिलेली कामे पुढील कार्यकाळात मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी इतर पदाधिकाऱ्यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन माजी गटनेते दिनेश दादरीवाल यांनी तर आभार प्रदर्शन शहर महामंत्री बाबा बिसेन यांनी केले.(जिल्हा प्रतिनिधी) - गोंदियात बाजार कर आकारणार नाही नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच जनतेसमोर जाताना या कार्यक्रमात काही संकल्प जाहीर करून घोषणा केल्या. ज्यामध्ये प्रामुख्याने छोट्या दुकानदारांकडून नपतर्फे आकरला जाणारा १० रुपये प्रतिदुकान हा कर आकारणे बंद करीत असल्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र प्रत्येक शहरवासीयांनी गृहकर जरूर भरावा असे सांगून त्यासाठी कडक धोरण अवलंबिण्याचे सूतोवाच त्यांनी केले. ४शहरात ठिकठिकाणी वृक्षांची लागवड करून गोंदियाला ग्रीनसिटी करणे, गोदरीमुक्त करून शहरातील ठराविक ठिकाणी सार्वजनिक सुलभ शौचालय निर्माण करणे, यासह नगारिकांना पिण्याचे शुध्द पाणी, शहरात स्वच्छता राहावी यासाठी प्रत्येक घरासमोरील कचरा गोळा करण्यासाठी नवीन प्रणाली विकसीत करण्याचे सुतोवाच त्यांनी यावेळी केले. वर्षभरात अनेक बदल होणार आहेत.