शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया मेडिकलचा मार्ग मोकळा?

By admin | Updated: June 16, 2016 02:19 IST

गोंदियातील बहुप्रतीक्षित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी अखेर भारतीय वैद्यकीय परिषद (एमसीआय) अनुकूल झाली

एमसीआय अनुकूल : काँग्रेस-राष्ट्रवादीने मांडला प्रयत्नांचा इतिहासगोंदिया : गोंदियातील बहुप्रतीक्षित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी अखेर भारतीय वैद्यकीय परिषद (एमसीआय) अनुकूल झाली असून त्यांची मंजुरी लवकरच मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे या मेडिकल कॉलेजसाठी कोणी कसे प्रयत्न केले याचा हिशेब मांडण्यासाठी सर्व पक्ष सरसावले आहेत.मंगळवारी विद्यमान खासदार नाना पटोले यांनी गोंदियात पत्रपरिषद घेऊन आपण खासदार झाल्यानंतर मेडिकल कॉलेजच्या मंजुरीसाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्या गोष्टी केल्या याची माहिती देत आधीच्या सरकारमधील लोकप्रतिनिधींनी केवळ सरकारची मंजुरी मिळवण्यापलिकडे काही केले नसल्याचा आरोप केला. त्यामुळे बुधवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने या मेडिकल कॉलेजसाठी निधी मिळवून देण्यापासून तर न्यायालयीन लढा लढण्यापर्यंत केलेल्या कामांचा हिशेब प्रसिद्धी पत्रकातून मांडला.तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी हे मेडिकल कॉलेज गोंदिया मिळवून देण्यासाठी दिल्ली दरबारी तसेच राज्य सरकारकडेही आपले वजन वापरले. ३० मार्च २०१२ रोजी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील आमदारांना घेऊन मुंबई येथे राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात गोंदियात मेडिकल कॉलेज मंजूर करावे अशी मागणी मांडली. त्यानंतर राज्यात मंजूर झालेल्या सहा वैद्यकीय महाविद्यालयांपैकी केवळ गोंदिया मेडिकल कॉलेजसाठी तत्कालीन केंद्र शासनाकडून १५० कोटी रुपये मंजूर करवून घेतले. एमसीआयच्या निकषानुसार हव्या असलेल्या गोष्टी करून घेण्यासाठी ते पैसे महत्वपूर्ण ठरले. तसेच या मेडिकल कॉलेजला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची आग्रही मागणी सरकारकडे केली. त्याला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यामुळे १४ एप्रिल २०१६ रोजी खा.प्रफुल्ल पटेल यांनी डॉ.बाबासाहेबांच्या नावाच्या फलकाचे अनावरण केले होते.दुसरीकडे आ.गोपालदास अग्रवाल यांनी राज्य सरकारकडे याबाबतची मागणी वारंवार लावून धरली होती. तसेच कुडवा येथील वनकायद्यात अडकणारी १५ हेक्टर जागा या मेडिकल कॉलेजला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. एवढेच नाही तर प्रफुल्ल अग्रवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात यासंदर्भात जनहित याचिका दाखल करून गोंदिया मेडिकल कॉलेजला एमसीआयकडून मंजुरी मिळण्यासाठी होत असलेल्या विलंबावर योग्य निर्देश देण्याची विनंती केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने एमसीआयच्या भूमिकेवर नापसंती व्यक्त करीत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. यासंदर्भात गुरूवार दि.१६ ला उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. यासोबतच गोंदिया मेडिकल कॉलेजला डिन व इतर वैद्यकीय कर्मचारी मिळवून देण्यातही त्यांचे योगदान मिळाले आहे.दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी नांदेडमध्ये बुधवारी एका कार्यक्रमादरम्यान गोंदिया मेडिकल कॉलेजमध्ये दरवर्षी १०० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असल्याचे सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)