शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया आगाराला रिक्त पदांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 21:37 IST

गोंदिया आगाराला चालक-वाहकांच्या रिक्त पदांचा फटका बसत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगारात ९२ बसेस उपलब्ध आहेत. १३४ चालक व ११५ वाहक कार्यरत आहेत. अशात सेवा उपलब्ध करून देण्यास आगार व्यवस्थापकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्देपदे भरण्याकडे दुर्लक्ष : प्रवासी सेवेवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया आगाराला चालक-वाहकांच्या रिक्त पदांचा फटका बसत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगारात ९२ बसेस उपलब्ध आहेत. १३४ चालक व ११५ वाहक कार्यरत आहेत. अशात सेवा उपलब्ध करून देण्यास आगार व्यवस्थापकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्याचा आर्थिक फटका आगाराला बसत आहे.गोंदिया आगारासाठी १६० चालक व १६० वाहकांची पदे मंजूर आहेत. परंतु मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्यामुळे चालक व वाहकांना ओव्हरटाईम करावे लागत आहे. तसेच याच कारणामुळे कुठेकुठे राज्य परिवहन मंडळाच्या प्रवासी सेवेवर परिणाम होत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगारात केवळ दोन शिवशाही बसेस सोडल्या तर अधिक बसेस भंगार झाल्या आहेत. काही बसेस कुठेही बंद होवून पडतात. त्यांच्या देखभाल दुरूस्तीची गरज आहे. काही बसेस तर एवढ्या भंगार झाल्या आहेत की त्यांना रस्त्यावर धावण्याचा कालावधी कधीचाच संपला आहे. अशा बसेसमुळे प्रवाशांना केवळ त्रासच होत नाही तर त्यांचा वेळ व पैसासुद्धा अकारण खर्च होतो. भंगार झालेल्या बसेस अद्यापही रस्त्यावर धावत असल्याने बरेचदा आगार व्यवस्थापकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागतो. आगारातील रिक्त पदांची आणि भंगार बसेसची समस्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. मात्र अद्यापही ही समस्या मार्गी लागलेली नाही.वर्षभरात आगाराला ४४ लाखांचे उत्पन्नचालक-वाहकांचा अभाव असलेल्या गोंदिया आगाराला आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये ४४.५१ लाखांचे उत्पन्न झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक इंगोले यांनी सांगितले. मार्च २०१८ मध्ये ३.२६ लाख व फेब्रुवारी २०१८ मध्ये १०.५० लाखांचे उत्पन्न झाले आहे. लग्न सराईच्या हंगामात प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने उत्पन्नात वाढ करणे शक्य होत आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ