शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात २२ हजार हेक्टरमधील धानपिकाला अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 14:21 IST

गोंदिया जिल्ह्यात धान पिकाची स्थिती चांगली असताना मागील दोन दिवसापासून असलेले ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा धानाला फटका असून शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकीडरोगाचा प्रादुर्भाव वाढला शेतकऱ्यांवर संकट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामानंतर उन्हाळी धानाची लागवड केली जाते. यंदा २२ हजार हेक्टरवर उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली आहे. धान पिकाची स्थिती चांगली असताना मागील दोन दिवसापासून असलेले ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा धानाला फटका असून शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता आहे.हवामान विभागाने पूर्व विदर्भात पुढील तीन दिवस वादळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. सोमवारी आणि मंगळवारी (दि.१६) सकाळच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. परिणामी वातावरणात अचानक बदल झाल्याने त्याचा पिकांवर परिणाम झाला आहे. वादळी पावसामुळे सर्वाधिक फळबागांचे नुकसान झाले. आब्यांची देखील मोठ्या प्रमाणात पडझड झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसला.गोंदिया जिल्ह्यात खरीपात १ लाख ७८ हजारावर तर रब्बीमध्ये ४६ हजारावर धानाची लागवड केली जाते. खरीप व रब्बी हंगामातील धान निघाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. ते शेतकरी उन्हाळी धानाची लागवड करतात. यंदा जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवर उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली. धान पिकासाठी अनुकुल वातावरण मिळाल्याने धान पीक जोमात आले होते.मात्र सोमवार आणि मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाचा उन्हाळी धानाला फटका बसला. तर ढगाळ वातावरण असल्याने धान पिकांवर कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून याचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने सुध्दा पुन्हा दोन तीन दिवस ढगाळ वातावरण राहिल्यास कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. खरीप व रब्बीनंतर शेतकरी वर्षभराचा खर्च भरुन काढण्यासाठी उन्हाळी धानाची लागवड करतात. याची शेतकऱ्यांना बरीच मदत होत असते. मात्र अवकाळी पाऊस आणि कीडरोगांमुळे शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

फळबागांना फटकाअवकाळी पाऊस आणि वादळाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील आंब्याच्या बागांना बसला आहे. वादळामुळे आंब्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून बागधारकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले.ढगाळ वातावरणामुळे धानावर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तर अवकाळी पावसामुळे धानासह इतर पिकांना फटका बसू शकतो.- नंदकिशोर नयनवाड, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.

टॅग्स :agricultureशेती