शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यातील तीस हजार शेतकऱ्यांचे खाते क्रमांक गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 15:10 IST

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजने अंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन स्वरूपात जमा केले जाणार आहे.

ठळक मुद्देमानधनाची रक्कम जमा करण्यास अडचण कृषी विभागाची वाढली डोकेदुखी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजने अंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन स्वरूपात जमा केले जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक,आधारकार्ड, सातबारा आदी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याचे काम सुरू आहे. मात्र या योजनेस पात्र तब्बल तीस हजार शेतकऱ्यांचे खाते क्रमांक नसल्याने कृषी व महसूल विभागाची डोकेदुखी वाढली आहे.गोंदिया जिल्ह्यात एकूण २ लाख ८६ हजार खातेदार शेतकरी आहेत. यापैकी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेस दोन हेक्टरपर्यंत शेती असणारे २ लाख ५४ हजार २४२ शेतकरी पात्र ठरले. कृषी आणि महसूल विभागाकडून योजनेस पात्र शेतकºयांची माहिती महाआॅनलाईनवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. या योजनेचा पहिला दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे काम सुरू आहे.आत्तापर्यंत २ लाखावर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या योजनेच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक नसल्याने त्यांच्या खात्यावर पैसे जमा करायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जवळपास ३० हजार शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक नाहीत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात आले नाही. याची सूचना सुध्दा प्रत्येक गावातील ग्रामपंचायतमध्ये याद्या प्रकाशित करुन दिली जात आहे.ज्या पात्र शेतकऱ्यांचे बँक खाते नाही त्यांना खाते उघडून खाते क्रमांक कृषी विभागाकडे देण्यास सांगितले जात आहे.नावातील घोळ कायमअनेक शेतकऱ्यांच्या सातबारावर वेगळे आणि आधारकार्डवर वेगळे नाव असल्याने या शेतकऱ्यांची माहिती आॅनलाईन अपलोड केल्यानंतर ती जुळत नसल्याने अर्ज स्विकारले जात नाही. त्यामुळे नावातील त्रृटी दूर करण्यासाठी कृषी आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणप्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचे अर्ज भरताना अनेक अडचणी येत आहे. तर नावातील त्रृटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे अर्ज स्विकारले जात नाही. त्यामुळे यासर्व त्रृटी दूर करण्यासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना या सर्व प्रक्रियेचे प्रशिक्षण सुध्दा दिले जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी