शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे रुग्ण बरे होण्यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 19:48 IST

गोंदिया जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा दर महाराष्ट्रात सर्वाधिक आहे.

ठळक मुद्देजिल्हयाचा कोरोना रिकव्हरी रेट ९० टक्के तर मृत्यु दर १.२५ टक्के२१४ रुग्णांची कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: देशात आणि राज्यात कोरोना विषाणुचा संसर्ग वेगाने वाढत आहे. जिल्हयात देखील त्या प्रमाणात कोरोनाचे बाधित रुग्ण आढळून येत आहे. तरीसुद्धा गोंदिया जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा दर महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. जिल्हयात गुरुवारी एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३९ असून त्यापैकी २१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सहा रुग्णांना नागपूर येथे पुढील उपचारासाठी दाखल केले होते. यातील एक रुग्ण नागपूर येथून बरा होऊन घरी परतल्यामुळे एकूण बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या २१४ झाली आहे.गोंदिया जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८९.५ टक्के इतका असून महाराष्ट्रात अव्वल असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ भूषणकुमार रामटेके यांनी दिली.बाहेर राज्यातून किंवा जिल्हयातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर पोलिस आणि आरोग्य विभागाची नजर आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची ताबडतोब संपर्क तपासून करून त्यांची माहिती घेणे देखील महत्वाचे कामे आहेत. तसेच संशयितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करुन त्यांचे संस्थात्मक विलगीकरण करणे किंवा गृह विलगीकरण करणे या गोष्टींचे नियोजन महत्वाचे ठरले आहे.जिल्ह्यातील प्रयोगशाळा चाचणी अहवालात बाधित २३० तर रॅपिड अँटिजेन चाचणीत पाच रुग्ण आढळले. जिल्ह्यातील चार रुग्णांची बाहेर जिल्ह्यात व राज्यात झाली.यामध्ये तीन रुग्णांची चाचणी नागपूर येथे तर एका रुग्णाची चाचणी बंगलोर येथे करण्यात आली आहे.या चारही रुग्णांचा समावेश जिल्ह्यात करण्यात आल्यामुळे एकूण बधितांची संख्या २३९ इतकी झाली आहे.कोविड-१९ कालावधीत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात अव्वल असून जिल्हावासियांसाठी ही मोठी दिलासा देणारी बाब आहे.जिल्हयातील नागरिकांना आजाराची कोणतीही लक्षणे असल्यास तात्काळ त्यांनी आरोग्य हेल्पलाईन क्रमांकावर 8308816666 / 8308826666 संपर्क करावा किंवा प्रशासनाला या बाबतची माहिती द्यावी.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या