शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

शेतकऱ्यांमुळे गोंदिया जिल्हा समृद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:24 IST

धान उत्पादकांचा जिल्हा अशी गोंदियाची ओळख असून ही ओळख शेतकºयांमुळेच निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी सर्वांगिन दृष्टीने समृद्ध झाल्यास जिल्हा समृद्ध होईल. यासाठी सिंचन प्रकल्प तयार करुन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवून त्यांचा सर्वांगिन विकास करण्याचे आपले ध्येय असल्याचे .....

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : दिवाळी मीलन कार्यक्रम, सिंचनाची समस्या दूर करणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धान उत्पादकांचा जिल्हा अशी गोंदियाची ओळख असून ही ओळख शेतकºयांमुळेच निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी सर्वांगिन दृष्टीने समृद्ध झाल्यास जिल्हा समृद्ध होईल. यासाठी सिंचन प्रकल्प तयार करुन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवून त्यांचा सर्वांगिन विकास करण्याचे आपले ध्येय असल्याचे आ.गोपालदास अग्रवाल यांनी सांगितले. स्थानिक प्रताप लॉन येथे आयोजित दिवाळी मीलन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, जि.प.आरोग्य व शिक्षण सभापती रमेश अंबुले, महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, उभसभापती चमनलाल बिसेन, माजी सभापती स्रेहा गौतम, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, गोंदिया-भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल, जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष पन्नालाल सहारे,अजीत गांधी, पृथ्वीपालसिंग गुलाटी, झामसिंग बघेले,अशोक लंजे, नामदेव किरसान, पी.जी.कटरे, डॉ.योगेंद्र भगत, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले, राजेश नंदागवळी, रत्नदीप दहीवले, अशोक चौधरी, पराग अग्रवाल, व्यकंट पाथरु, चुन्नीभाऊ बेंद्रे, धनलाल ठाकरे, अरुणकुमार दुबे, विठोबा लिल्हारे,आशिषसिंह नागपूरे, जगदीश अग्रवाल, खेमनबाई बिरनवार, सावलराम महारवाडे, आशिष चव्हान, प्रकाश रहमतकर, भागवत नाकाडे, डोमेंद्र रहांगडाले, दिलीप असाटी, शेषराव गिरेपुंजे, खेमराज साखरे उपस्थित होते.आ.अग्रवाल म्हणाले, तालुक्यातील शेतकºयांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी बाघ सिंचन प्रकल्पातंर्गत येणाºया ३०० कि.मी.नहराचे खोलीकरण व दुरूस्ती करण्यात आली. खमारी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले असून लवकरच १० नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहेत.तालुक्यातील सर्व ६६ प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये डॉक्टरांची नियुक्ती करुन नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे.रावणवाडी येथे ५ कोटी रुपयांच्या निधीतून नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभारण्यात येणार आहे.मागील वर्षी कामठा, नवरगाव, बटाना, खातीया येथे तयार करण्यात आलेल्या बंधाºयामुळे एक हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सोय झाली आहे. पांजरा-लंबाटोला दरम्यान ५ कोटी रुपयांच्या निधीतून बंधारा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तर तालुक्यातील ३४ गावांचा समावेश जलयुक्त शिवार योजनेत करण्यात आला आहे. तालुक्यात सर्वत्र १५० कि.मी.लांबीचे रस्ते तयार करण्यात आले.त्यामुळे नागरिकांची रस्त्यांची समस्या मार्गी लागली आहे. सीमा मडावी म्हणाल्या, जनतेला खोटी आश्वासने देवून केंद्र आणि राज्यात सत्तेवर आलेल्या सत्तारुढ सरकारला आगामी लोकसभा निवडणुकीत धडा शिकविण्याचे आवाहन केले. अंबुले म्हणाले सरकारने निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही.केवळ मोठमोठ्या घोषणा करुन प्रत्यक्षात एकाही योजनेची अंमलबजावणी केली नाही. उलट जनतेला महागाई आणि दरवाढीची भेट दिली. त्यामुळे अशा विश्वासघातकी सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन त्यांनी केले. दिवाळी मिलन कार्यक्रमाला उपस्थित अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल