शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर असलेला गोंदिया जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 05:00 IST

जिल्ह्यात काही दशकांपूर्वी ३० हजारांच्या जवळपास जलाशये होती. पण यापैकी आता काहीच शिल्लक आहेत. ज्या जलाशयांची जैवविविधता चांगली त्यावर पक्षी येतात. सारस संवर्धनासाठी काम करणाऱ्या सेवा संस्थेच्या चमूने पक्ष्यांचा अधिवास असणारी जलाशये निवडली. परसवाडा, लोहारा,नवतलाव या तीन तलावांकरिता सामाजिक वनिकरण, जैवविविधता विभाग व वनविभागाची मदत घेवून या जलाशयाची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला.

अंकुश गुंडावार ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जलाशयांच्या संवर्धनासाठी पर्यावरण, जैवविविधतेसह इतर घटक महत्त्वपूर्ण असतात. मात्र प्रदूषणाचे प्रमाण अधिक असेल तर याचा जलाशयांवर आणि पक्ष्यांच्या स्थलांतरणावर सुध्दा मोठा परिणाम होतो. कोरोनामुळे मागील दोन महिन्यांपासून सर्वत्र लॉकडाऊन असल्याने प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्याचे अनुकुुल परिणाम सुध्दा दिसून आहे. वन्यप्राण्यांचा सुध्दा मुक्त संचार वाढला आहे. गोंदिया जिल्हा जैवविविधतेने नटलेला असल्याने दुर्मिळ समजले जाणारे सारस पक्षी आणि स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर अशी ओळख गोंदिया जिल्ह्याची होवू लागली आहे. जलाशयांमधील जैवविविधता टिकविण्यासाठी स्वयंसेवी संस्थेने सन २०१२ पासून धडपड सुरू केली. त्यातून परसवाडा, लोहारा व आमगाव येथील नवतलाव अशी तीन उत्कृष्ट जलोद्याने तयार झाली आहेत. तर बाजारटोला, झालीया, झिलमीली या तलावांमधील जैवविविधता जोपासून पक्षी आणि त्यावर अवलंबून असलेल्या घटकांचे संवर्धन केले जात आहे. जिल्ह्यात काही दशकांपूर्वी ३० हजारांच्या जवळपास जलाशये होती. पण यापैकी आता काहीच शिल्लक आहेत. ज्या जलाशयांची जैवविविधता चांगली त्यावर पक्षी येतात. सारस संवर्धनासाठी काम करणाऱ्या सेवा संस्थेच्या चमूने पक्ष्यांचा अधिवास असणारी जलाशये निवडली. परसवाडा, लोहारा,नवतलाव या तीन तलावांकरिता सामाजिक वनिकरण, जैवविविधता विभाग व वनविभागाची मदत घेवून या जलाशयाची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. जैवविविधता, त्यावर येणारे पक्षी आणि पर्यावरण याचा अभ्यास करुन जलाशय टिकविण्याच्या मूळ कारणांचा शोध घेण्यात आला.जैवविविधतेने नटलेला जिल्हातलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात जैवविविधतेने नटलेला आहे. तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये अनेक जैव वनस्पती आहेत. या तलावांमध्ये पक्ष्यांसाठी पोषक असलेलेले खाद्य मिळत असल्याने दरवर्षी लाखो विदेशी पक्षी जिल्ह्यातील जलाशयांवर हजेरी लावतात. नवेगावबांध परिसर यासाठी प्रसिध्द आहे.दुर्मिळ समजल्या जाणाºया व प्रेमाचे प्रतिक म्हणून ओळखल्या जाणाºया सारस पक्ष्यांचे सुध्दा या ठिकाणी अधिवास तयार झाले आहे.सर्वाधिक ४४ सारस पक्ष्यांची नोंद ही जिल्ह्यात झाली आहे.जिल्हा जंगल व्याप्त असल्याने या अनेक दुर्मिळ वनस्पती सुध्दा आढळतात. सालेकसा तालुक्यातील मुरकुडोह दंडारी येथील जंगलात दुर्मिळ बांबु असून त्यापासून चांगली बासरी तयार केली जाते.गोंदिया जिल्ह्यात अनेक दुर्मिळ वनस्पती असून जलाशयांचे प्रमाण देखील अधिक आहे.या जलाशयांमध्ये पक्ष्यांसाठी पोषक असलेले खाद्य आणि अनुकुल जैवविविधता असल्याने स्थलांतरित पक्षी मोठ्या प्रमाणात येतात. या जलाशंयामधील वनस्पतींचे संवर्धन करण्याची गरज आहे. चिला, कमळ यासारख्या वनस्पतींचे प्रमाण वाढविल्यास पक्ष्यांना खाद्य मिळण्यास मदत होईल.- मुकुंद धुर्वे , पर्यावरणतज्ज्ञतलावांचे रिस्टोरेशन, व्यवस्थापन व कृती आराखडा आणि अमंलबजावणी करून तीन तलावांचे पुनरूज्जीवन करण्यात आले. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन कामे केली. गावात भिंतीवर चित्र काढून जनजागृती केली. त्यामुळे जिल्ह्यातील तीन जलाशये पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ‘मॉडेल’ ठरत आहेत.- सावन बहेकार, पर्यावरणतज्ज्ञ

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य