शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात दहावीची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 21:31 IST

दहावीची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या १७ वर्षाच्या मुलावर चाकूने प्राणघातक हल्ला करून त्याचा खून केल्याची घटना ३ मार्चच्या सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गोंदिया तालुक्याच्या मोरवाही येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कआरोपी फरारगोंदिया: दहावीची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या १७ वर्षाच्या मुलावर चाकूने प्राणघातक हल्ला करून त्याचा खून केल्याची घटना ३ मार्चच्या सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गोंदिया तालुक्याच्या मोरवाही येथे घडली. अतुल अशोक तरोणे (१७) रा.मोरवाही असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. मंगळवारी दहावीचा मराठीचा पेपर असल्याने तो पेपर देण्यासाठी गेला होता. पेपर देऊन घरी परतत असताना त्याला त्याच्या घरापासून ४०० ते ५०० मीटर अंतरावर असलेल्या एका गव्हाच्या शेतात त्याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्याच्या डोक्यावर, शरीरावर चाकूचे घाव मारले. या घटनेची वाच्यता त्याने कुणाकडे करू नये म्हणून त्याची जीभही कापण्यात आली आहे. रक्ताच्या थारोळ््यात पडलेल्या त्या मुलाला उपचारासाठी गोंदियाच्या एका खासगी रूग्णालयात नेण्यात आले होते. परंतु उपचारही कामी आला नाही. सायंकाळी ७.३० वाजता त्याचा मृत्यू झाल्याने त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी त्याला गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आले. जुन्या वैनमस्यातून त्याचा खून झाल्याची चर्चा गावात होती. परंतु मारेकरी कोण याची माहिती मिळू शकली नाही. सदर घटनेसंदर्भात गोंदिया ग्रामीण पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे

टॅग्स :Murderखून