शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्हा झाला कोरोनामुक्त; जिल्हावासीयांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 21:32 IST

मंगळवारी गोंदिया येथील कोविड केअर सेंटरमधील एकाच कोरोना बाधितावर उपचार सुरू होता. बुधवारी तो सुध्दा कोरोनामुक्त झाल्याने त्याला कोविड केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे.

ठळक मुद्दे२१ दिवसात ६८ जण कोरोनामुक्त  

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेला कोरोना बाधित बुधवारी (दि.१०) कोरोनामुक्त झाला. त्यामुळे आता गोंदिया जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला असून २१ दिवसांच्या कालावधीत ६८ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आता एकही कोरोना बाधित रुग्ण नसून आता जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त कसा ठेवता येईल हे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.२६ मार्चला गोंदिया जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर हा रुग्ण बरा होवून एप्रिल महिन्यात घरी परतला. तब्बल ३८ दिवस जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊनमुळे विविध राज्यात आणि जिल्ह्यात अडकून असलेल्या मजूर आणि नागरिकांना त्यांच्या स्वगृही जाण्याची परवानगी दिली. त्यामुळे मुंबई, पुणे आणि इतर रेड झोनमधील नागरिक स्वगृही परतले. यामुळे कोरोना संसगार्चा धोका वाढला. मुंबई, पुण्याहून आलेल्या नागरिकांमुळे १९ मे रोजी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ६८ वर पोहचली. विशेष म्हणजे हे सर्व कोरोना बाधित ग्रामीण भागातील असल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील चांगले असल्याने २१ दिवसांच्या कालावधीत सर्वच कोरोना बाधित कोरोनामुक्त झाले. मंगळवारी गोंदिया येथील कोविड केअर सेंटरमधील दोन कोरोना बाधितापैकी एक जण कोरोनामुक्त झाला. त्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये केवळ एकाच कोरोना बाधितावर उपचार सुरू होता. बुधवारी तो सुध्दा कोरोनामुक्त झाल्याने त्याला कोविड केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात आता एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याने जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. निश्चितच ही जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे.

प्रशासनासमोर कोरोनामुक्त ठेवण्याचे आव्हानतब्बल २१ दिवसांच्या कालावधीनंतर गोंदिया जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे जिल्हा यापुढेही कसा कोरोनामुक्त राहील यासाठी जिल्हा आणि आरोग्य प्रशासनाला उपाययोजना करण्याची गरज आहे. बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाऱ्या नागरिकांवर बारीक नजर ठेवून त्यांची सीमा तपासणी नाक्यावर आरोग्य तपासणी करण्याची गरज आहे.कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर असणार आहे.

कोविड केअर सेंटरमध्ये आनंदाचे वातावरणयेथील जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये मागील २१ दिवसात एकूण ६८ कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करण्यात आले होते. मात्र यानंतर हळूहळू रुग्ण बरे होवून परत गेल्याने केवळ एका कोरोना बाधितावर उपचार सुरू होता. पण बुधवारी (दि.१०) तो कोरोना बाधित सुध्दा कोरोनामुक्त झाल्याने कोविड केअर सेंटरमध्ये आता एकही कोरोना बाधित नाही. बुधवारी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला सुटी देताना येथील डॉक्टर आणि परिचारिकांनी कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. एकंदरीत कोविड केअर सेंटरमध्ये आनंदाचे वातावरण होते.

१०६० स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्हकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण ११२९ जणांचे स्वॅब नमुने घेवून नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ६८ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह तर १०६० स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या