शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 23:28 IST

शहराच्या बापूनगरातील एका १६ वर्षाच्या मुलाने १९ फेब्रुवारीला ११.४८ वाजता दरम्यान गोंदियातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप ‘हसी के रसगुल्ले’ यावर हिंदू देवीची नग्न व अश्लील चित्रफीत तयार करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकली.

ठळक मुद्देहिंदू देवीची विटंबना प्रकरण : मोटारसायकल रॅली काढून केला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहराच्या बापूनगरातील एका १६ वर्षाच्या मुलाने १९ फेब्रुवारीला ११.४८ वाजता दरम्यान गोंदियातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप ‘हसी के रसगुल्ले’ यावर हिंदू देवीची नग्न व अश्लील चित्रफीत तयार करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकली. त्यामुळे गोंदिया शहराचे वातावरण तापले असून या प्रकाराच्या निषेर्धात आज (दि.२३) कडकडीत बंद ठेवण्यात आला.हिंदू धर्मियांच्या धार्मीक भावना दुखावणाऱ्या त्या समाजातील १६ वर्षाच्या विधीसंघर्षित बालकावर रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याने हसी के रसगुल्ले या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर ती चित्रफीत टाकताच सिव्हील लाईनच्या रविशंकर वॉर्डातील निखिल मधुकर चंदनकर (२६) या तरूणाने आक्षेप घेत रामनगर पोलीस ठाणे गाठले. त्याच्याविरूध्द तक्रार करण्यात आली. रामनगर पोलिसांनी त्या विधीसंघर्षीत बालकावर १५३ अ २९५ अ सहकलम ६७, ६७ अ माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.तो इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसला आहे. त्याच्याकडे ही अश्लील चित्रफीत कुठून आल्याची चौकशी रामनगर पोलिसांनी त्याच्या पालकांच्या समोर केली. कुठूनतरी आलेल्या लिंकला डाऊनलोड केल्यामुळे ती चित्रफीत त्याला मिळाल्याचे त्याने सांगितले असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. हे कृत्य हेतूपुरस्सर रित्या करण्यात आले असून हिंदू बांधवांच्या भावना दुखाविण्याचा प्रयत्न करण्यात आला. असे कृत्य यापुढे होऊ नये यासाठी गोंदिया शहरात बंदचे आवाहन करण्यात आले होते.या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. व्यापारी प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली होती. पेट्रोलपंप बंद होते. त्यामुळे नागरिकांची अडचणही झाली. कापड दुकाने, किराणा दुकान, दागिण्यांची दुकाने असे सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यामुळे शहरातील बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट होता.शेकडो तरुणांनी काढली बाईक रॅलीपुलवामा घटनेच्या जखमा भरत नाही तोच पुन्हा गोंदियात हिंदूच्या अस्मीतेवर आघात करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा मॅसेज गोंदियाच्या विविध व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर फिरला.त्यातून स्वयंस्फूर्तीने शेकडो तरूणांनी २३ फेब्रुवारीला गोंदिया बंदला प्रतिसाद देत गोंदिया शहरातून मोटारसायकल रॅली काढली. भारत माता की जय अशा घोषणा देत ही रॅली काढण्यात आली.

टॅग्स :Strikeसंप