शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया विधानसभेवर पुन्हा सेनेचा दावा?

By admin | Updated: July 1, 2014 23:31 IST

सलग दोन वेळा गोंदिया विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारी शिवसेना यावेळी हा मतदार संघ भाजपसाठी सोडणार असल्याची शक्यता गेल्या वर्षभरापासून व्यक्त केली जात होती.

भाजपात अस्वस्थता : मेळाव्यातून शिवसैनिकांना जागृत करण्याचा प्रयत्नगोंदिया: सलग दोन वेळा गोंदिया विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारी शिवसेना यावेळी हा मतदार संघ भाजपसाठी सोडणार असल्याची शक्यता गेल्या वर्षभरापासून व्यक्त केली जात होती. मात्र शिवसेना आपला हा दावा सहजासहजी सोडण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे भाजपाच्या गोटात मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. गोंदियात शनिवारी झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात थेट कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंना आणून शिवसेनेने पुन्हा एकदा शिवसैनिकांना जागृत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.भाजप-सेना युतीत आतापर्यंत गोंदिया विधानसभा मतदार संघ शिवसेनेच्या ताब्यात होता. १९९५ मध्ये प्रस्थापितांविरोधात आलेल्या लाटेत शिवसेनेचे रमेश कुथे विजयी झाले. त्यानंतर १९९९ मध्येही त्यांनी सलग दुसऱ्यांचा विजय मिळवून हा मतदार संघ शिवसेनेसाठी हक्काचा करून घेतला. मात्र नंतरच्या दोन्ही निवडणुकीत त्यांना विजय मिळविणे कठीण झाले. अडीच वर्षापूर्वी झालेल्या गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. याचवेळी भाजपने ४० पैकी १६ जागा पटकावून नगर परिषदेत सर्वात जास्त जागा पटकावणारा पक्ष म्हणून नोंद केली. एकीकडे भाजपचे वाढलेले वर्चस्व तर दुसरीकडे शिवसेनेची ढिली झालेली पकड पाहता पुढील निवडणुकीत गोंदिया विधानसभेच्या जागेवर युतीमधील घटकपक्ष असलेला भाजप दावा करणार हे जवळजवळ निश्चित समजले जात आहे. भाजपला तिकीट दिल्यास कोण रिंगणात उतरेल आणि कसा सामना रंगू शकेल याच्या चर्चाही अधूनमधून चवीने केल्या जात आहेत. त्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, विद्यमान जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, माजी अध्यक्ष नेतराम कटरे, जिल्हा महामंत्री दीपक कदम हे इच्छुकांच्या लाईनमध्ये आहेत. विशेष म्हणजे भाजपला सर्वाधिक जागा मिळवून देणाऱ्या गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीची धुरा अग्रवाल यांच्याकडेच होती. त्यामुळे तिकीट वाटपात युतीकडून हा मतदार संघ भाजपला देण्यात यावा असा दावा भाजपच्या गोटातून केला जात आहे. असे असताना शिवसेनेने पुन्हा आपल्या धनुष्याची दोरी बांधणे सुरू केले आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. शिवसेनेकडे हा मतदार संघ कायम राहिल्यास पुन्हा एकदा रमेश कुथे रिंगणात उतरणार की आपले धाकटे बंधू आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजकुमार कुथे यांना पुढे करणार याबाबतही चर्चा रंगत आहे.लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचाही उत्साह वाढला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षीय संघटन मजबूत करण्याकडे फारसे लक्ष न देणाऱ्या शिवसेनेने कार्यकर्ता मेळावा घेऊन निवडणुकीची चाहूल दिली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)