शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया-बालाघाट-समनापूर ट्रेन धावणार रविवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:05 IST

जबलपूर रेल्वे लाईन अंतर्गत गोंदिया-बालाघाट-समनापूर ट्रेन रविवारी (दि.१) एप्रिलपासून लोहमार्गावर धावणार आहे. या गाडीला बालाघाट रेल्वे स्थानकातून रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा हिरवी झेंडी दाखवून रवाना करणार आहेत.

ठळक मुद्देबालाघाट येथून रवाना : रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा दाखविणार हिरवी झेंडी

ऑनलाईन लोकमतगोंदिया : जबलपूर रेल्वे लाईन अंतर्गत गोंदिया-बालाघाट-समनापूर ट्रेन रविवारी (दि.१) एप्रिलपासून लोहमार्गावर धावणार आहे. या गाडीला बालाघाट रेल्वे स्थानकातून रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा हिरवी झेंडी दाखवून रवाना करणार आहेत.गोंदिया ते जबलपूरपर्यंतच्या ब्रॉडगेज रेल्वे लाईनचे काम बालाघाट ते समनापूरपर्यंत पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता गोंदिया-बालाघाट-समनापूर ट्रेन १ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. बालाघाट येथे आयोजित कार्यक्रमात रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा सायंकाळी ४.४० वाजता हिरवी झेंडी दाखवून ट्रेनला रवाना करतील. याप्रसंगी प्रामुख्याने दपूम रेल्वेचे जीएम सुनील सोईन, डीआरएम अमित अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येने राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे गोंदिया ते बालाघाट रेल्वे लाईनचे काम आधीच पूर्ण झाले आहे. त्यावर सध्या गोंदिया-बालाघाट रेल्वेगाड्या सुरू आहेत. परंतु आता समनापूरपर्यंत रेल्वे लाईन सुरू होणे व समनापूर ते नैनपूरपर्यंतचे केवळ ६० किमी अंतराचे काम शिल्लक आहे. नैनपूर ते जबलपूरपर्यंतच्या लाईनचे ब्रॉडगेजचे काम पूर्ण झाल्यावर या वर्षाच्या शेवटी गोंदिया ते जबरपूरपर्यंत संपूर्ण रेल्वे सेवेचा लाभ या क्षेत्रातील प्रवाशांना मिळू शकेल.जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये दोन कोचचा विस्तारप्रवासी गाड्यांमध्ये होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेवून रेल्वे प्रशासनाने गोंदिया-रायगड-गोंदिया जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये दोन अतिरिक्त बोगी अस्थायी स्वरूपात ३० मार्च २०१८ पर्यंतच लावल्या होत्या. आता याचा विस्तार ३० जून २०१८ पर्यंत करण्यात आला आहे. या सुविधेचा लाभ रेल्वे प्रवाशांना कंफर्म सीटच्या रूपात मिळू शकेल. गाडी (१२०७०/१२०६९) गोंदिया-रायगड-गोंदिया जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये दोन सामान्य चेयरकार अनुक्रमे गोंदियावरून २९ जून २०१८ पर्यंत व रायगडवरून ३० जून २०१८ पर्यंत विस्तार करण्यात आले आहे.