शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया व तिरोडा आगाराच्या बसफेऱ्या रद्द

By admin | Updated: July 23, 2014 23:41 IST

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ते खराब झाली आहेत. काही रस्त्यांवरून गेलेल्या नदी-नाल्यातील पाणी रस्त्यावर आल्याने एसटी महामंडळाची बससेवा प्रभावित झाली आहे.

पावसाचा फटका : नागरिकांची डोकेदुखी वाढलीगोंदिया: गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ते खराब झाली आहेत. काही रस्त्यांवरून गेलेल्या नदी-नाल्यातील पाणी रस्त्यावर आल्याने एसटी महामंडळाची बससेवा प्रभावित झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा आगारातून संचालित होणाऱ्या काही बसफेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती गोंदिया व तिरोडा आगार व्यवस्थापकांनी दिली आहे. गोंदिया आगारातून मिळालेल्या माहितीनुसार, वाघनदीच्या पुलावर ८ फूटपर्यंत पाणी चढल्यामुळे गोंदिया-बालाघाट बससेवा बाधित झाली आहे. याशिवाय गोंदिया-देवरी मार्गावर डवकी नाला, गोंदिया-बोडूंदा मार्गावर बोरगाव नाला, गोंदिया-दवनीवाडा-तिरोडा मार्गावर अत्री नाला, गोंदिया-गल्लाटोला मार्गावर खडखडी नाला, गोंदिया-सालेकसा मार्गावर रोंढा नाला, गोंदिया-कामठा-आमगाव मार्गावरील किकरीपार नाल्यावर पाणी चढल्याने या मार्गावरील बस सेवा थांबविण्यात आली आहे. याशिवाय गोंदिया-घिवारी-चांदनीटोला आणि गोंदिया-हिरापूर मार्गावरील पुराडी गावाजवळ वृक्ष पडल्यामुळे मार्ग बंद आहे. २१ जुलै रोजी नाल्यांना पूर आले व रस्त्यांवर वृक्ष पडल्यामुळे जवळपास गोंदिया आगाराच्या ७० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तिरोडा आगारातून रजेगावमार्गे बालाघाटकडे होणाऱ्या एकूण ४० बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्या बसेस केवळ सातोनापर्यंतचा प्रवास करून परतत आहेत. तिरोड्यावरून चांदपूरकडे होणाऱ्या १० फेऱ्या (दि.२२) रद्द करण्यात आल्या आहेत. या फेऱ्या केवळ बेलाटीपर्यंतच होणार असल्याची माहिती तिरोड्याचे आगार व्यवस्थापक एम.डी. नेवारे यांनी दिली. तसेच तिरोडा-खैरलांजी-वाराशिवनी-बालाघाट असा प्रवास करणाऱ्या बसेस खैरलांजीपुढील रस्ता अत्यंत खराब झाल्याने केवळ खैरलांजीपर्यंतच संचालित करण्यात आल्या आहेत. मलपुरी गावाजवळील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने तिरोडा-गोरेगाव बस गावात प्रवेश न करता गावाबाहेरूनच आपला पुढील प्रवास करीत आहे. सरांडी ते केसलेवाडा रस्ता बंद असल्याने मानव विकास कार्यक्रमाच्या चार फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तिरोडा-गोंडमोहाळी-गोंदिया मार्गावर दवनीवाडा येथील पुलाजवळ मोठ्या प्रमाणात किचड तयार होवून रस्ता खराब झाल्याने या मार्गावरील सहा फेऱ्या रद्द रद्द करण्यात आल्या. तिरोडा आगाराने दिलेल्या माहितीनुसार, विविध मार्गांवरील नाल्यांना पूर आल्यामुळे एकूण ४८ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)