शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मनोहरभाई पटेलांची स्वप्नपूर्ती करण्याचेच लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 21:58 IST

गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती शिक्षित झाला पाहिजे. तो उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये. यासाठी शिक्षणमहर्षी स्व. मनोहरभाई पटेलांनी गोंदिया शिक्षण संस्थेची स्थापना केली.

ठळक मुद्देराजेंद्र जैन : ३५० विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश व संगणक प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती शिक्षित झाला पाहिजे. तो उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये. यासाठी शिक्षणमहर्षी स्व. मनोहरभाई पटेलांनी गोंदिया शिक्षण संस्थेची स्थापना केली. संपूर्ण जीवन दुसऱ्यांच्या हितासाठी जगून समाजसेवेतून लोकांना स्वावलंबी व स्वाभिमानी बनविले. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून खा. प्रफुल पटेल, संस्थाध्यक्ष वर्षा पटेल व गोंदिया शिक्षण संस्थेने मनोहरभाई पटेलांची स्वप्नपूर्ती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे प्रतिपादन संस्था सचिव राजेंद्र जैन यांनी केले.गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित नटवरला माणिकलाल दलाल महाविद्यालयात मनोहरभाई पटेल अ‍ॅकादमी व जीईएस सोशल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने नि:शुल्क स्पोकन इंग्लिश व संगणक प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून ते मार्गदर्शन करताना बोलत होते.या वेळी प्रामुख्याने प्राचार्य डॉ. रजनी चतुर्वेदी, स्पोकन इंग्लिशचे प्रशिक्षक डॉ.एस.यू. खान, डॉ. मुनेश ठाकरे, कार्यक्रम समन्वयक डॉ. भावेश जसानी उपस्थित होते.प्रास्ताविकातून डॉ. चतुर्वेदी यांनी मनोहरभाई पटेलांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा उल्लेख केला. त्यांनी शिक्षित युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली तसेच जीईएस सोशल फोरमचा उद्देश समाजहितासाठी असून संस्थेचे सर्व कर्मचारी समाजसेवा करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले.डॉ. खान यांनी, इंग्रजी भाषा ही इतर भाषांपेक्षा सोपी असून आपण बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इंग्रजी भाषा रोजगार उपलब्ध करून देण्यास सक्षम असल्याचे सांगितले. तर कंप्यूटर प्रशिक्षक मुनेश ठाकरे यांनी, आय संगणक युग असून आॅनलाईन पद्धतीमुळे वेळ व पैशाची बचत होते, असे सांगितले. तसेच डॉ. जसानी यांनी, जीईएस फोरमच्या माध्यमाने विविध सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा व रोजगाराची संधी उपलब्ध करून आत्मनिर्भर व्हावे, असे सांगितले.संचालन डॉ. कपिल चव्हाण यांनी केले. आभार डॉ. जसानी यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. शारदा महाजन, प्रा. राकेश खंडेलवाल, डॉ. दिलीप जेना, डॉ. भूमिका ठाकूर, डॉ. अर्चना जैन, प्रा. संतोष होतचंदानी, प्रा. शशिकांत बिसेन, प्रा. उर्विल पटेल, डॉ. प्रवीणकुमार, डॉ. संजय जगणे, प्रा. तृप्ती पटेल, प्रा. कविता पटेल, प्रा. गीता पटेल, प्रा. रवी रहांगडाले, प्रा. रविंद्र मोहतुरे, प्रा. प्रेम बसेने, प्रा. निलकंठ भेंडारकर, डॉ. कृष्णा मेश्राम, प्रा. नरेश भुरे, प्रा. रत्ना विश्वास तसेच मनोहरभाई पटेल अ‍ॅकादमी व जीईएस सोशल फोरमच्या सदस्यांनी सहकार्य केले.