शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ध्वजारोहण करुन नवरदेवाने वाढविली महाराष्ट्राची शान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 23:58 IST

मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा ! संकट देशा ! कणखर देशा...असा सार्थ अभियान असलेल्या महाराष्ट्राच्या निर्मितीचा सोहळा, अर्थात महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राची अस्मिता बाळगणाऱ्या सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरा करीत ध्वजारोहण करुन महाराष्ट्राला नतमस्तक होवून मानवंदना दिली.

संजयकुमार बंगळे ।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा ! संकट देशा ! कणखर देशा...असा सार्थ अभियान असलेल्या महाराष्ट्राच्या निर्मितीचा सोहळा, अर्थात महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राची अस्मिता बाळगणाऱ्या सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरा करीत ध्वजारोहण करुन महाराष्ट्राला नतमस्तक होवून मानवंदना दिली. महाराष्ट्र दिनाचा एक अविस्मरणीय प्रसंग अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महालगाव ग्रामपंचायत येथे पहावयास मिळाला. येथील हितेश फुलबांधे या युवकाने (नवरदेवाने) महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण प्रसंगी उपस्थिती दर्शवून नंतर लग्न मंडपाकडे प्रयाण करीत महाराष्ट्राची शान वाढविली.ग्रामपंचायत महागाव येथे महाराष्ट्र दिनाच्या ५८ व्या वर्धापन दिनी प्रशासक अनुपकुमार भावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी महागाव येथील युवक हितेश फुलबांधे यांचे भंडारा जवळील खुर्शीपार येथे दुपारी ११.३० वाजता लग्न होते. लग्नासाठी निघालेली वरात, बँडबाजा वाद्यासहित ग्रामपंचायत समोरुन जात असताना ग्रामपंचायतमधील ध्वजारोहणचा कार्यक्रम पाहुन नवरदेवाने बँडबाजा बंद करुन प्रत्यक्ष ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी होवून आपल्या अंगी असलेल्या राष्ट्रप्रेमाचा परिचय दिला. त्यांचे हे राष्ट्रहिताचे कर्तव्य बघून वरातीतील वऱ्हाडी मंडळीने ध्वजारोहणाला उपस्थिती दर्शविली. ‘आधी लगीन कोंढाण्याचे, मग लग्न’ या महाराष्ट्राच्या इतिहासाची पुन्हा नव्याने या प्रसंगाने प्रचिती आली. ध्वजारोहणाप्रसंगी ग्रामविकास अधिकारी एम.बी. वाघमारे, ग्रा.पं. सदस्य लोणारे, साखरे, श्रीमती रामटेके, नरवीश पटेल, आशा मखरे, पोलीस पाटील भागवत झोळे, लिपिक नेवारे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.महाराष्ट्राबद्दल असलेल्या प्रेमाची प्रचिती नवरदेव हितेश फुलबांधे व वरातीतल सहभागी वऱ्हाडी मंडळीची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

टॅग्स :Maharashtra Dayमहाराष्ट्र दिन