शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथदिंडीने लक्ष वेधले

By admin | Updated: October 17, 2016 00:38 IST

माजी राष्ट्रपती व युवकांचे प्रेरणास्थान भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून येथील सर्व शैक्षणिक संस्थामध्ये साजरी करण्यात आली.

इटखेडा : माजी राष्ट्रपती व युवकांचे प्रेरणास्थान भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून येथील सर्व शैक्षणिक संस्थामध्ये साजरी करण्यात आली. या निमित्ताने ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले.शालेय अभ्यासा व्यतिरिक्त विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी, युवक-युवती, नागरिकांमध्ये पुस्तके वाचून ज्ञान प्राप्तीची रुची वाढीस लागावी, प्राप्त ज्ञानाचा लाभ सुदृढ समाजनिर्मितीसाठी व्हावी याची जनजागृती करण्यासाठी इसापूर-इटखेडा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, स्वामी विवेकानंद व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ज्ञान विकास वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. सर्व शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, ग्रा.पं.चे पदाधिकारी, वाचन प्रेमी नागरिक ग्रंथ दिंडीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची प्रतिमा व विविध विषयावरील ग्रंथ यांनी सुशोभीत केले. रथ रस्त्यावरून निघालेले पाहून या मिरवणुकीत नागरिक सहभागी झाले. वाचनाप्रती जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी हाती घेतलेले घोषणा फलक, बॅनर्स यांनी ग्रंथदिंडीची शोभा वाढविली. इसापूर-इटखेडा या दोन्ही गावातून या ग्रंथदिडीचे मार्गक्रमण केले. ग्रंथदिंडीमध्ये माजी सभापती उमाकांत ढेंगे, सरपंच अस्मिता वैद्य, पं.स.उपसभापती आशा झिलपे, उपसरपंच वासुदेव उके, देविदान पालीवाल, विश्वनाथ गोठे, मोरेश्वर भावे, पुंडलिक धोटे, वसंता हटवार, कुंता कोकोडे, सुशिला गोंडाणे, चेतन शेंडे, मोरेश्वर गोंडाणे, प्रल्हाद चांदेवार, चंद्रकला शेंडे, विजय मेश्राम, प्रमोद वकेकार, दिगांबर झिलपे, अशोक डोंगरे, अभिमन्यू लोणारे, माजी प्राचार्य लक्ष्मण माटे, संतोष रोकडे, सुनिता मडावी, प्राचार्य लहू भावे, पर्यवेक्षक भूवन झोडे, प्राचार्य विश्वनाथ डांगे, मुख्याध्यापक यशवंत शेंडे, अशोक गुप्ता, संगीता नवखरे, भारती रामटेके, नितु परविन पठाण, प्रा.भगवंत फुलकटवार, पूर्णचंद्र धोटे, धनेश लंजे, बालाजी मस्के, संजय खुणे, राजेश धोटे, जयप्रकाश करंजेकर, आदे, अनिल भावे, आकरे, भाकरे, पेशने, धर्मपाल तोंडरे, पद्मजा मेहंदळे, पुष्पा फुंडे, देविदास नाकतोडे, राजु डोंगरवार, हरिभाऊ शेंडे, दुधराम कोल्हे, राजू शेंडे, बनकर, कासार, बनसोड, जयप्रकाश मेश्राम, यशवंत मेश्राम, पुरूषोत्तम राऊत उपस्थित होते.