शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या

By admin | Updated: September 10, 2015 02:15 IST

आदिवासी व नक्षलग्र्रस्त तालुका म्हणून गणल्या जाणाऱ्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात आजघडीला ग्रामीण भागातील सर्वसामान्य...

डोंगरवार यांची मागणी : अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा पुरवठा कराबोंडगावदेवी : आदिवासी व नक्षलग्र्रस्त तालुका म्हणून गणल्या जाणाऱ्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात आजघडीला ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेशी निगडित असलेली आरोग्य सेवा सर्वत्र कोलमडलेल्या अवस्थेत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी झरपडा येथील सामाजिक कार्यकर्ते व तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष डॉ. गजानन डोंगरवार यांनी केली आहे. दीड लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या तालुक्यात सद्यस्थितीत नवेगावबांध व अर्जुनी-मोरगाव या दोन ठिकाणी ग्रामीण रुग्णालये आहेत. आदिवासी तालुका असलेल्या अर्जुनी-मोरगाव येथे सामान्य व गोरगरीब कुटुंबांचे सर्वाधिक वास्तव्य आहे. बदलत्या हवामानानुसार तालुक्यात रोगराईचे प्रमाणसुध्दा वाढत आहे. महागडा औषधोपचार करणे सामान्य जनतेच्या ऐपतीबाहेरचा आहे. तालुक्याच्या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून ३० खाटांचा ग्रामीण रुग्णालय देखण्या ईमारतीमध्ये सुरू आहे. दिवसें-दिवस रुग्णालयात येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दिवसाकाठी २०० च्या जवळपास बाह्यरुग्णांची तपासणी केली जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र तालुका स्तरावरील ग्रामीण रुग्णालयात आवश्यक सोयी तसेच यंत्रसामुग्री उपलब्ध नसल्याने अनेकदा रुग्णांना प्राथमिक औषधोपचार करून बाहेर ठिकाणी हलविण्याचा सल्ला देण्यात येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गजानन डोंगरवार यांनी सांगितले. हलाखीच्या जीवनात सामान्य गोरगरीब जनतेला खासगी औषधोपचार करणे शक्य नाही. शासनाच्या वतीने विविध आरोग्य सेवा मोफत असल्या तरी तालुक्यातील सर्वसामान्य दारिद्र्य रेषेच्या खाली जीवन जगणाऱ्या कुटुंबाला शासनाच्या आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत असल्याची खंत डॉ. डोंगरवार यांनी व्यक्त केली. आजघडीला तालुक्याच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात बऱ्याच गैरसोयीचा दिसत आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव असल्याने तालुक्यातील जनतेला पाहिजे त्या प्रमाणात आरोग्य सेवेचा लाभ मिळत नाही. आदिवासी भागातील जनतेला आरोग्य सेवा तत्परतेने मिळून सर्व रोग्यांचे निराकरण होण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा रुग्णालयात करून खाटांची मर्यादा वाढवावी, तज्ञ डॉक्टरांचा भरणा करण्यात यावा, सोनोग्राफी, सीटीस्कॅन, रक्त तपासणी चाचण्यासंबंधीच्या उपकरणांची पूर्तता करण्यात यावी, अशी मागणी तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष डॉ. गजानन डोंगरवार यांनी केली. (वार्ताहर)