शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या उड्डाणपुलाचा अहवाल १० जुलैपर्यंत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 22:35 IST

शहरातील गोंदिया-बालघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात यावा. असे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानंतर याच विषयावर बुधवारी (दि.१) जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वे, .......

ठळक मुद्देवाहतूक सुरू ठेवण्यास रेल्वेचा विरोध : बैठकीत विविध विषयांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील गोंदिया-बालघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात यावा. असे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानंतर याच विषयावर बुधवारी (दि.१) जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक नियंत्रण विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे विभागाने संयुक्तपणे पुलाचे सर्व्हेक्षण करुन १० जुलैपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले.गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपुलाच्या बांधकामाला बरीच वर्षे झाली आहे. त्यामुळे हा पूल जीर्ण झाला असून पुलाला ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. त्यामुळे रेल्वे ट्रॅक परिसरातील पुलाचा भाग केव्हाही कोसळू शकतो. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी सुरु ठेवणे योग्य नसल्याचे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच दिले. त्यानंतर शहरवासीयांमध्ये खळबळ उडाली. मात्र आ.गोपालदास अग्रवाल यांनी जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केल्यास शहरवासीयांची कोंडी होण्याची शक्यता वर्तविली. त्यानंतर त्यांनी संबंधित विभागाकडे वरिष्ठ पातळीवर पाठपुरावकरुन जुन्या उड्डाणपुलावरुन दुचाकी आणि चारचाकी हलक्या वाहनाना प्रवेश देण्याची मागणी केली. अग्रवाल यांची मागणी प्रशासनाने तुर्तास मान्य केली. मात्र रेल्वे विभाग जुन्या उड्डाणपुलावरुन वाहतूक सुरु ठेवण्यास अनुकुल नाही. वाहतूक पूर्णपणे बंद करण्यासाठी रेल्वेकडून जिल्हा प्रशासनावर दबाव वाढविला जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी (दि.१) या विषयावर संबंधित विभागाच्या अधिकाºयांची बैठक बोलविली.बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाला जुन्या उड्डाणपुलावरुन हलकी वाहनाची वाहतूक सुरू ठेवणे योग्य आहे का असा सवाल केला. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी हलक्या वाहनाची वाहतूक सुरू ठेवण्यास कुठलीही अडचण नसल्याचे सांगितले. मात्र रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची मागणी केली. तसेच एखादी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहणार असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर जिल्हाधिकारी बलकवडे यांनी रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तज्ञ चमूने पुलाचे बारीक सर्वेक्षण करुन आणि सर्व तांत्रिकबाबीची पडताळणी करुन १० जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जुन्या उड्डाणपुला संदर्भात निर्णय घेण्यात येईल असे सांगितल्याची माहिती आहे.