जिल्हाधिकार्यांना निवेदन : गोंडवाना मित्र मंडळ कल्याण समितीची मागणीगोंदिया : नगरांची रचना होण्यापूर्वी आदिकाळापासून येथे आदिवासींचे निवास आहे. आदिवासींच्या गोंड समाजामुळेच या शहराला 'गोंडिया' म्हणजे गोंदिया असे नाव मिळाले. आदिवासींच्या प्रतिष्ठेसाठी गोंदिया शहरातील नवनिर्मित उड्डाण पुलाला 'क्रांतिवीर बिरसा मुंडा' असे नाव देण्यात यावे, यासाठी गोंडवाना मित्र मंडळ कल्याण समितीतर्फे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना देण्यात आला.निवेदनानुसार, गोंदिया नावाशी आदिवासी गोंड समाजाची आस्था व संस्कृती जुडलेली आहे. देशाच्य मानचित्रात गोंदिया जिल्हा आदिवासी नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. हजारो आदिवासी या जिल्ह्यात राहतात. त्यांची ओळख त्यांची संस्कृती र्देकसा (सालेकसा) तालुक्याच्या क्षेत्रातील त्यांचे आराध्य देव 'पहांदी पारी कुपार लिंगो' नावाने ओळखली जाते. तेथे महासंमेलनात देशाच्या प्रत्येक प्रांतातील जनसमुदाय मोठय़ा संख्येत उपस्थित राहतो.त्यामुळे वरिष्ठांनी गोंदियातील नवनिर्मित उड्डाण पुलास 'क्रांतिकारी बिरसा मुंडा' यांचे नाव द्यावे. मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ मध्ये झाले होते. ते शोषणमुक्त व भयमुक्त भारत निर्माण करू इच्छित होते. समतामूलक समाज स्थापनेचे त्यांचे ध्येय होते. देशाला स्वतंत्र करण्यासाठी इंग्रजांच्या विरूद्ध आपले जल-जंगल-जमीन यासाठी त्यांनी 'उल गुलाल'ची स्थापना केली. त्यामुळे या उड्डाण पुलास त्यांचे नाव दिल्यास ही वास्तू आदिवासी समाजाच्या ओळखीचा आधारस्तंभ ठरेल.शासन केवळ दिखाव्यासाठी आदिवासी समाजासाठी विविध योजना लागू करतो. कारण या योजनांचा लाभ आदिवासींना मिळतच नाही. या समाजाचा नेहमीच शोषण केला जात आहे. आदिवासी समाजाच्या ओळखीसाठी या नवनिर्मित उड्डाण पुलास 'क्रांतिवीर बिरसा मुंडा उड्डाण पूल' असे नाव देण्यात यावे. अशा मागणीचे निवेदन गोंडवाना मित्र मंडळ कल्याण समिती तर्फे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले आहे.निवेदन देतेवेळी गोंडवाना मित्र मंडळ कल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पंधरे, सचिव अनिल वट्टी, प्रमिला सिंद्रामे, पी.बी. टेकाम, उमेश उईके, सुनीता कोकोडे, एस.पी. मरस्कोल्हे, राजेश वट्टी, दुर्गाप्रसाद कोकोडे, नेवालाल उईके, टी.एम. मडावी, तानेश ताराम, ओमप्रकाश पटले, रूपराज कोडापे, परेश्वर उईके, एन.डी. किरसान, संजय मरस्कोल्हे, मुन्ना नागभिरे, मंदा तोडसाम, सुषमा मरकाम, जी.जी. तोडसाम, डी.एल. तुमडाम, भरत टेकाम, राधेश्याम टेकाम, विष्णू उईके, दिनेश मडावी, गणेश पंधरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
उड्डाण पुलास क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचे नाव द्या
By admin | Updated: May 15, 2014 01:27 IST