शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी नगर पंचायत राष्ट्रवादीच्या हातात द्या

By admin | Updated: September 23, 2015 05:33 IST

लोकसभेत आणि विधानसभेत मतदारानी आम्हाला पाहिजे तसे यश दिले नाही. परंतु जिल्ह्याचे हाल आता काय

सडक-अर्जुनी : लोकसभेत आणि विधानसभेत मतदारानी आम्हाला पाहिजे तसे यश दिले नाही. परंतु जिल्ह्याचे हाल आता काय आहेत सर्वांना माहीत आहे. त्यामुळे सर्वांगीन विकासासाठी सडक-अर्जुनीची नगर पंचायत राष्ट्रवादीच्या हातात द्या, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता खा.प्रफुल्ल पटेल यांनी केले. सडक-अर्जुनीच्या शादीखान हॉलमध्ये ते मंगळवारी मार्गदर्शन करीत होते.सडक-अर्जुनी नगर पंचायतच्या निवडणुकीनिषयी मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. याप्रसंगी आ.राजेंद्र जैन, प्रादेशिक प्रतिनिधी देवेंद्र चौबे, मनोहर चंद्रीकापुरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिनखेडे, जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर, जि.प. सदस्य रमेश चुऱ्हे, मिलन राऊत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ.अविनाश काशिवार, उपसभापती आनंद अग्रवाल, देवचंद तरोणे, खुटेजी मसराम, इसुफ पटेल उपस्थित होते.नगर पंचायतच्या निवडणुका लक्षात घेवून खा.पटेल यांची ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला संबोधित करताना पटेल पुढे म्हणाले की, उच्छे दिनच्या नावावर आपली सर्वांची दिशाभूल करण्यात आली. तुरीची दाळ सामान्य लोकांना विकत घेणे कठीण झाले. धानाचे भाव वाढले नाही. ऊसाचे चुकारे मिळाले नाही, महागायीचा कळस गाठला गेला हेच का अच्छे दिन अशी टीका केली. प्रास्ताविक गंगाधर परशुरामकर यांनी मांडले. सडक-अर्जुनी तालुका निर्मितीमध्ये पटेल यांचेच योगदान असल्याचे सांगितले. निवडणूक संदर्भात यावेळी मनोहरराव चंद्रीकापुरे, युसुफ पटेल, खटूजी मसराम, मिलन राऊत, देवचंद तरोणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सडक-अर्जुनी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ.अविनाश काशीवार यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेशखा.प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सडक-अर्जुनी तालुक्यातील शेकडो लोकांनी मंगळवारी पटेल यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सर्वांना राष्ट्रवादीचा दुपट्टा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.