शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मृत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 05:00 IST

अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे देशातील २९ राज्यांतील ८० लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे या आंदोलनात नेतृत्व केले. कोरोना महामारीच्या दोन लाटा आल्या असून या महामारीच्या संकटाचे निराकरण धैर्याने करण्याचे शौर्य प्रत्येक राज्यातील आरोग्य व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी केली आहे. अशा या कर्तव्यनिष्ठ कामगार कर्मचाऱ्यांच्या हक्कांचा संकोच करणारे कायदे सध्या मंजूर केले जात असून शासनाच्या या धोरणाचा राज्य कर्मचाऱ्यांनी दिवसभर काळी फीत लावून निषेध व्यक्त केला.

ठळक मुद्देराज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना : काळी फीत लावून केला शासन धोरणाचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  कोरोनामुळे मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने मंगळवारी (दि.२०) काळी फीत लावून आंदोलन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय विरोध दिन पा‌ळत जिल्हाधिकारी नयना गुंडे यांना प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या नावाने निवेदन देण्यात आले. अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे देशातील २९ राज्यांतील ८० लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे या आंदोलनात नेतृत्व केले. कोरोना महामारीच्या दोन लाटा आल्या असून या महामारीच्या संकटाचे निराकरण धैर्याने करण्याचे शौर्य प्रत्येक राज्यातील आरोग्य व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी केली आहे. अशा या कर्तव्यनिष्ठ कामगार कर्मचाऱ्यांच्या हक्कांचा संकोच करणारे कायदे सध्या मंजूर केले जात असून शासनाच्या या धोरणाचा राज्य कर्मचाऱ्यांनी दिवसभर काळी फीत लावून निषेध व्यक्त केला. तसेच, प्रत्येक राज्यातील रिक्त पदे भरावी, सर्वांना जुनी पेन्शन लागू करावी, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देय असलेले आर्थिक लाभ द्यावे, कोरोनामुळे मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्यावी, मोफत लसीकरण तत्काळ करण्यात यावे, या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी गुंडे यांना देण्यात आले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य सरचिटणीस लीलाधर पाथोडे, सहसचिव  आशिष रामटेके, अखिल भारतीय जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हाध्यक्ष पी.जी. शहारे, ग्रामसेवक कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याjobनोकरी