शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एक जॉबकार्डधारकाला २५० दिवस काम द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:53 IST

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता रोजगार हमी योजनेंतर्गत १०० दिवस कामांच्या ऐवजी २५० दिवस कामाची कालमर्यादा वाढविण्यात यावी,

ठळक मुद्देदिलीप बन्सोड : १०० दिवस कामाचा नियम स्थगित करा

लोकमत न्यूज नेटवर्ककाचेवानी : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता रोजगार हमी योजनेंतर्गत १०० दिवस कामांच्या ऐवजी २५० दिवस कामाची कालमर्यादा वाढविण्यात यावी, अशी मागणी माजी आ. दिलीप बन्सोड यांनी उपजिल्हाधिकारी (रोहयो) व तहसीलदार तिरोडा यांना निवेदन देवून केली आहे.निवेदनानुसार, शासनाने एका कुटुंबात एक जॉबकार्ड तयार केल्यास १०० दिवस काम उपलब्ध करून देण्यात येईल, अशी तरतूद केली. एका जॉबकार्डमध्ये पाच नावे असतील तर २० दिवसच काम एका कुटुंबाला मिळणार आहे. त्यामुळे त्या कुटुंबाने वर्षभर उदरनिर्वाह कसा करावा, अशी समस्या निर्माण झाली आहे.भारत सरकारने १०० दिवस प्रत्येक कुटुंबाला काम देण्याची योजना तयार केली. त्यासाठी कुटुंबाला जॉबकार्ड तयार करायला लावले. जॉबकार्ड तयार करायला लावले. जॉबकार्ड तयार करताना स्पष्ट निर्देश देण्यात आले नसल्याने लाभार्थी कुटुंबाने एकाच जॉबकार्डमध्ये अनेक नावे नोंदविले. त्यामुळे एक पंधरवाडा किंवा तीन आठवडे काम पूर्ण झाले की त्या मजुराला कामावरून बंद केले जात आहे, असेही माजी आ. बन्सोड यांनी सांगितले.गोंदिया व भंडारा जिल्ह्यात यावर्षी पावसाअभावी दुष्काळी परिस्थित आहे. शेतकरी व शेतमजुरांना कामे नाहीत. अशात त्यांनी काय करावे.वर्षभर परिवाराचे भरणपोषण व शैक्षणिक समस्या कशी सोडवावी. अशी समस्या आहे. त्यामुळे शासनाने एका जॉबकार्डवर कमीतकमी २०० किंवा २५० दिवस कामाची सीमा वाढवावी, अशी मागणी बन्सोड यांनी केली आहे.रोहयो राज्य शासनाचीनरेगा ही भारत सरकारची योजना असून यात १०० दिवस काम देण्याची हमी देण्यात आली आहे. मात्र रोहयो ही राज्य शासनाची योजना असून यात अशी कोणतीही अट नाही. राज्य शासनाने शेतकरी व मजुरांची गंभीर समस्या पाहून जिल्ह्यात रोहयोची कामे करून सरसकट प्रत्येक मजुराला काम मिळेल, अशी योजना तयार करावी, अशी मागणी बन्सोड यांनी केली आहे.अनेक कुटुंब कामावरून बंदवर्षभरात १०० दिवसांचे कामपूर्ण झाल्याचे सांगून अनेक मजूर कामावरून बंद करण्यात आले. त्यामुळे मजुरांना एप्रिल महिन्यापर्यंत काम मिळणार नाही, अशा परिस्थितीतून बाहेर कसे पडता येईल, याचा विचार शासनाने करावा. कुटुंबावर अन्याय होणार नाही, अशी उपाययोजना करावी.मजुरांसोबत उपोषणाचा इशाराकेंद्र शासनाने आपल्या १०० दिवसांच्या कामाच्या आदेशात किंवा योजनेत बदल करून आपातस्थितीत कामाचा कालावधी वाढविण्यात यावा. तसेच राज्य शासनाने रोहयोच्या कामात वाढ करून मजुरांची समस्या मार्गी लावावी. वर्षभर पुरेल अशी व्यवस्था भंडारा व गोंदिया दोन्ही जिल्ह्यांसाठी करावी, अन्यथा मजुरांसह आंदोलन करणार, असा इशारा निवेदनातून दिला आहे.

टॅग्स :jobनोकरी