शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल मंजुरीचे अधिकार ग्रामपंचायतला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 22:29 IST

घरकुलांना मंजुरी देण्याची प्रक्रिया ही पंचायत समिती स्तरावरुन पूर्ण केली जाते. मात्र ग्रामपंचायत अंतर्गत प्रस्ताव पाठवून सुध्दा वर्ष वर्षभर घरकुल मंजूर केले जात नाही. मंजुरी दिली तर त्याचे देयके वेळेवर दिली जात नाही.

ठळक मुद्देपुष्पमाला बडोले : मंजुरीअभावी लाभार्थ्यांची पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : घरकुलांना मंजुरी देण्याची प्रक्रिया ही पंचायत समिती स्तरावरुन पूर्ण केली जाते. मात्र ग्रामपंचायत अंतर्गत प्रस्ताव पाठवून सुध्दा वर्ष वर्षभर घरकुल मंजूर केले जात नाही. मंजुरी दिली तर त्याचे देयके वेळेवर दिली जात नाही. लाभार्थी पंचायत समितीच्या पायऱ्या झिजवून थकून जातात.त्यामुळे घरकुल मंजुरीचे अधिकार ग्रामपंचायत दिल्यास ही प्रक्रिया जलद गतीने राबविण्यास मदत होईल. शासनाने याचा विचार करुन घरकुल मंजुरीचे अधिकार ग्रामपंचायतला द्यावे अशी मागणी शासनाकडे सरपंच पुष्पमाला बडोले यांनी केली आहे.ग्रामीण भागात आज ही ५० टक्के घरे ही मातीने बांधलेली आहे.सततच्या पावसाने भिंती ओल्या होतात, जीर्ण झालेली घरं पडतात, परिणामी कधी कधी प्राणहानी तर कधी दुखापत होऊन घर पडल्याने त्यांना बेघर होऊन इतर ठिकाणी आश्रय घ्यावा लागतो.त्यामुळे बरेच लाभार्थी घरकुल मंजूर करुन घेण्यासाठी सरपंच आणि सदस्यांकडे येतात. मात्र ग्रामपंचायतच्या हातात केवळ प्रस्ताव पाठविणे ऐवढेच असते. घरकुल मंजुरीचे अधिकार हे पंचायत समिती आणि जि.प.ला आहे. मात्र त्यांना गावातील वास्तविक परिस्थिती माहिती नसते, शिवाय कुणाला घरकुलाची गरज आहे अथवा नाही याची सुध्दा कल्पना नसते.त्यामुळे अनेकदा गरजू लाभार्थ्यांवर अन्याय होतो.शिवाय लाभार्थ्यांना वर्षभर त्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे ही सर्व परिस्थिती लक्षात घेता घरकुल मंजुरीचे अधिकार हे ग्रामपंचायतला देण्यात यावे अशी मागणी सरपंच पुष्पमाला बडोले यांनी केली आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाgram panchayatग्राम पंचायत