शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांना हेक्टरी ३५ हजार रुपयांची आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:32 IST

मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील सर्व पिके धोक्यात आली आहेत. जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे.

ठळक मुद्देअग्रवाल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील सर्व पिके धोक्यात आली आहेत. जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकºयांना प्रती हेक्टर ३५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.आमदार अग्रवाल यांनी जिल्ह्याचा दौरा करुन पिकांची पाहणी केली. पावसाअभावी धान पीक पूर्णपणे धोक्यात आले आहे. जलाशयांमध्ये देखील अत्यल्प पाणीसाठा असून दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतातूर असून अशा स्थिती शेतकºयांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. हीच बाब हेरून आ.अग्रवाल यांनी मंगळवारी (दि.२२) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेता डॉ.राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांना पावसाअभावी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची माहिती दिली. ५० टक्के झालेल्या रोवण्या संकटात आल्या आहे. तर ५० टक्के रोवणी शिल्लक असून पाऊस न झाल्याने ती देखील वाळत चालली आहे. शेतकºयांनी मोठ्या आशेने व पैशाची जुळवाजुळव करुन खरीपाची तयारी केली. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने शेतकºयांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असून पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. पावसाअभावी मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून त्याचे त्वरीत पंचनामे करण्याची मागणी अग्रवाल यांनी केली. तसेच जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकºयांना प्रती हेक्टर ३५ हजार रुपये या प्रमाणे आर्थिक मदत देण्याची मागणी अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागण्यांवर गांर्भीयाने विचार व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आ.अग्रवाल यांना दिले.उपसा सिंचन योजनेचा विद्युत पुरवठा सुरळीत करापावसाअभावी जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती पाहता जिल्ह्यातील सर्व उपसा सिंचन योजनाचा खंडीत वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा. तसेच थकीत वीज देयकामुळे खंडीत केलेला कृषीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी अग्रवाल यांनी केली.शेतकºयांना तातडीने १० हजार रुपयांचे कर्ज द्यासरकारने थकबाकीदार शेतकºयांना १० हजार रुपयांचे अग्रीम कर्ज उपलब्ध करुन दिले. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकºयांना तातडीने १० हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करुन द्यावे. कर्ज आणि कर वसुलीला स्थगिती देण्याची मागणी केली.