शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

चांदाफोर्ट गाडीला डबल इंजीन द्या

By admin | Updated: June 21, 2015 01:12 IST

गोंदिया- चांदाफोर्ट रेल्वे गाडीच्या इंजिनमध्ये वारंवार होत असलेल्या बिघाडामुळे गाडीला उशीर होतो.

प्रवाशांची मागणी : दिवसातून तीन वेळा इंजन होते बंदबाराभाटी : गोंदिया- चांदाफोर्ट रेल्वे गाडीच्या इंजिनमध्ये वारंवार होत असलेल्या बिघाडामुळे गाडीला उशीर होतो. नेहमीच होत असलेला हा प्रकार लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने या गाडीला डबल इंजीन द्यावे अशी मागणी या गाडीतून प्रवास करणारे नागरिक करीत आहेत. चांदाफोर्ट-गोंदिया दरम्यान मोठ्या प्रमाणात शासकीय व निमशासकीय कर्मचारी, व्यापारी व विद्यार्थीही दररोजचा प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास अत्यंत सुरक्षित व सोयीस्कर मानला जात असल्याने या सर्वांना गोंदिया-चांदाफोर्ट ही गाडी एक वरदानच ठरली आहे.क्वचितच रेल्वे उशीर करते, त्यामुळे गाडीवर विश्वास ठेवूनच कर्मचारी व विद्यार्थी या गाडीतून प्रवास करतात. मात्र या गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड येऊन गाडी उशिरा पोहचत असल्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे मात्र कर्मचारी कार्यालयात तसेच विद्यार्थी शाळा व महाविद्यालयांत उशिरा पोहचून त्यांचे नुकसान होत आहे. गाडीत घडत चाललेल्या या प्रकाराकडे मात्र रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. मात्र याचा त्रास या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भोगावा लागत आहे. वारंवारचा हा प्रकार आता प्रवाशांना असह्य होत असल्याने या गाडीला डबल इंजिन लावण्यात यावे अशी मागणी प्रवासी रेल्वे प्रशासनाकडे करीत आहेत. (प्रतिनिधी)बुधवारी (दि.१७) चांदाफोर्ट वरुन सायंकाळी ३ वाजता सुटणारी रेल्वे ३ वेळा प्रवासादरम्यान बंद पडली. ही गाडी ६ वाजता पोहोचायला हवी होती मात्र रात्री १२ वाजता पोहोचली. त्यामुळे बुधवारचा प्रवास प्रवाशांसाठी अत्यधीक दगदगीचा व अविस्मरणीय ठरला आहे. आता भविष्यात या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता या गाडीला डबल इंजन लावावे अशी मागणी गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे.