लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत भरनोली परिसरातील आदिवासी व इतर मजुरांकडून सन २०१५ ते सन २०१७ या कालावधीत तेंदूपत्ता तोडून संकलनाचे कार्य वनविभागाने करवून घेतले. परंतु वनविभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे सदर मजुरांना बोनसची रक्कम अजुनही देण्यात आली नाही.बोनस स्वरूपात मिळणारी रक्कम येत्या १५ दिवसांत मजुरांना मिळाली नाही तर आंदोलन छेडणार, असा इशारा नॅशनल आदिवासी फेडरेशन शाखा अर्जुनी-मोरगावचे अध्यक्ष गोवर्धन पाटील-ताराम यांनी दिला आहे. सन २०१५ ते २०१७ या कालावधीत भरनोली गटग्रामपंचायत परिसरातील आदिवासी व इतर मजुरांकडून वनविभागाने तेंदूपत्ता संकलन करण्याचे कार्य केले. तीन वर्षे लोटूनही तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना देय असलेल्या बोनसची रक्कम अजूनही मिळाली नाही. संबंधित विभागाला या प्रकरणी अनेकदा विनंती अर्ज पाठविण्यात आले आहे. परंतु वनविभाग याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गोवर्धन ताराम यांनी केला आहे.संबंधित विभागाने १५ दिवसांच्या आत बोनसची रक्कम तेंदूपत्ता संकलन करणाºया मजुरांच्या बँक खात्यात जमा केली नाही तर नॅशनल आदिवासी फेडरेशन तालुका अर्जुनी-मोरगावचे अध्यक्ष गोवर्धन पाटील-ताराम यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी वनविभाग जबाबदार असेल, असेही प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांचे बोनस द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:38 IST
अर्जुनी-मोरगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत भरनोली परिसरातील आदिवासी व इतर मजुरांकडून सन २०१५ ते सन २०१७ या कालावधीत तेंदूपत्ता तोडून संकलनाचे कार्य वनविभागाने करवून घेतले. परंतु वनविभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे सदर मजुरांना बोनसची रक्कम अजुनही देण्यात आली नाही.
तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांचे बोनस द्या
ठळक मुद्दे गोवर्धन पाटील-ताराम : १५ दिवसांत बोनस न मिळाल्यास आंदोलन