शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धानाला २५०० रुपये प्रती क्विंटल भाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST

गोंदिया, भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या भागातील धान हेच मुख्य पीक असून यावरच या भागातील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. मात्र मागील दोन तीन वर्षांपासून धान उत्पादक शेतकरी सातत्याने दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून त्यांना आधार देण्याची गरज आहे. केंद्र शासनाने धानाला यंदा १८३५ रुपये प्रती क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे पवारांना साकडे : विविध मागण्यांचे दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धानाच्या लागवड खर्चात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने धानाची शेती तोट्याची होत चालली आहे. त्यातच केंद्र सरकारने धानाला जाहीर केलेला हमीभाव हा फार कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे खा.प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्त्वात गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच विविध मागण्यांचे निवेदन या वेळी पवार यांना देण्यात आले.गोंदिया, भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या भागातील धान हेच मुख्य पीक असून यावरच या भागातील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. मात्र मागील दोन तीन वर्षांपासून धान उत्पादक शेतकरी सातत्याने दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून त्यांना आधार देण्याची गरज आहे. केंद्र शासनाने धानाला यंदा १८३५ रुपये प्रती क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. तर राज्य सरकारने नुकताच प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस जाहीर केला आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या बोनसमध्ये १८५ रूपयांची वाढ करुन धानाला एकत्रीत २५०० रुपये प्रती क्विंटल हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना खा.प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनातून केली. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योगांची स्थापना करुन शेतकºयांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्याची मागणी केली. या वेळी खा.सुनील तटकरे उपस्थित होते. शिष्टमंडळात माजी मंत्री नाना पंचबुध्दे, माजी आ. राजेंद्र जैन, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, प्रदेश सचिव धनंजय दलाल, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, भंडारा जि.प.चे उपाध्यक्ष विवेकानंद कुर्झेकर, यशवंत सोनकुसरे, किशोर तरोणे, डॉ. अविनाश काशीवार, लोमेश वैद्य, देवचंद ठाकरे, शैलेश मयूर, सुनंदा मुंडले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेलSharad Pawarशरद पवार