शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मुलींनी आपली सुरक्षा स्वत: सुनिश्चीत करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 22:03 IST

गेम्स स्पोर्टस अँड करियर डेवलपमेंट फाऊंडेशनच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या अशा उपक्रमांची समाजाला गरज आहे. या आत्मसुरक्षा शिबिरात शिकलेल्या कलेचा उपयोग मुलींनी कठीण प्रसंगात करावा तसेच दुसऱ्यांच्या सुरक्षेसाठीही पुढे यावे. मुलींनी आपली सुरक्षा स्वत: सुनिश्चित करावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी केले.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : आत्मसुरक्षा शिविराचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गेम्स स्पोर्टस अँड करियर डेवलपमेंट फाऊंडेशनच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या अशा उपक्रमांची समाजाला गरज आहे. या आत्मसुरक्षा शिबिरात शिकलेल्या कलेचा उपयोग मुलींनी कठीण प्रसंगात करावा तसेच दुसऱ्यांच्या सुरक्षेसाठीही पुढे यावे. मुलींनी आपली सुरक्षा स्वत: सुनिश्चित करावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी केले.गेम्स स्पोर्टस अँड करियर डेवलपमेंट फाऊंडेशनच्यावतीने निर्भय बेटी सुरक्षा अभियानांतर्गत आयोजीत आत्मसुरक्षा शिबिराच्या समारोपीय महाशिबिरात इंदिया गांधी स्टेडियम येथे ६ फेब्रुवारी रोजी त्या बोलत होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, वन अधिकारी स्वाती डुमरे, मानवाधिकार संघटनेच्या धर्मिष्ठा सेंगर, संघटनेचे सचिव आदेश शर्मा, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, प्रोग्रेसिव्ह स्कूलचे संचालक डॉ. निरज कटकवार, रवी आर्य, फाऊंडेशनचे संघरक्षक लोकेश यादव, अध्यक्ष चेतन मानकर उपस्थित होते.याप्रसंगी गांगरेड्डीवार यांनी, मुलींना क्रीडा क्षेत्रातून पुढे येण्याचा मार्ग दाखवित मार्गदर्शन केले. दरम्यान, २० मुली, २० प्रशिक्षक व प्राचार्यांचा स्मृतीचिन्हे देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, महाशिबिरात सुमारे २ हजार मुलींनी प्रशिक्षण शिबिरात गिरविलेल्या धड्यांचे प्रात्यक्षिक उपस्थित पाहुणे व नागरिकांसमोर करून दाखविले. संचालन मुजीब बेग यांनी केले. आभार लोकेश यादव यांनी मानले. कार्यक्रमासाठी दिपक सिक्का, निलेश फुलबांधे, संतोष बिसेन, अंकुश गजभिये, अंजनकर, कपासे, ज्वाला तुरकर, निखील बरबटे, पूजा मोटघरे, आकांक्षा कटकवार, कृष्णा विभार, मयूर बघेले आदिंनी सहकार्य केले.८ हजार मुलींना दिले नि:शुल्क प्रशिक्षणफाऊंडेशनच्या माध्यमातून निर्भय बेटी सुरक्षा अभियानांतर्गत २८ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत शहरातील २० शाळांत हे आत्मसुरक्षा शिबिर घेण्यात आले. वर्ग ६ ते १० पर्यंतच्या मुलींना या प्रशिक्षणात कराटे, तायक्वांडो, कुंफू व आत्मसुरक्षेचे धडे नि:शुल्क देण्यात आले. अशा प्रकारे शिबिरांचे आयोजन करून फाऊंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ८ मुलींना नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात आले आहे.