शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मुलींनी आत्मनिर्भर व्हावे- रहांगडाले

By admin | Updated: January 14, 2015 23:11 IST

आपल्या मनात प्रबळ इच्छाशक्ती व समाजोपयोगी कार्य करण्याची इच्छा असली तर निश्चितपणे ध्येय गाठता येते. तंत्रज्ञानाच्या युगात स्त्रीशक्तीने आत्मनिर्भर असणे ही महत्वाची बाब आहे,

गोंदिया : आपल्या मनात प्रबळ इच्छाशक्ती व समाजोपयोगी कार्य करण्याची इच्छा असली तर निश्चितपणे ध्येय गाठता येते. तंत्रज्ञानाच्या युगात स्त्रीशक्तीने आत्मनिर्भर असणे ही महत्वाची बाब आहे, असे मत सोनी जि.प. सदस्य सीता रहांगडाले यांनी व्यक्त केले. फुलचूर हायस्कूल येथे तीन दिवसीय स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करता होत्या. उद्घाटन संस्था सचिव किसनसिंह बैस, उपाध्यक्ष पी.डी. शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. मंचावर जि.प. सदस्य सीता रहांगडाले, जि.प. सदस्य राजेश चतुर, पंचायत फुलचूर लक्ष्मी निर्वीकार, शिक्षक प्रतिनिधी पी.के. बिसेन, के.सी. नागपूरे, कविता हरडे, अनिल सुर्यवंशी व इतर मान्यवर उपस्थित होते.जि.प. सदस्य रहांगडाले यांनी तंत्रज्ञानाच्या युगात, मोबाईल, इंटरनेटचा उपयोग शैक्षणिक कामासाठीच वापरण्याचा सल्ला दिला. जि.प. सदस्य राजेश चतूर यांनी ही या युगात टिकून राहण्यासाठी परिश्रम चिकाटी असावी असे मत प्रदर्शित केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक एन.एस. श्रीभद्रे यांनी तर अहवाल वाचन वार्षिकोत्सव प्रभारी ओ.जे. कटरे यांनी केले. यावेळी पुष्पसजावट, प्रश्नमंच, स्वयंस्फुर्त भाषण आदि वैद्धिक कार्यक्रम घेण्यात आले. रांगोळीतूनही वनसंवर्धन, पाणी वाचवा इत्यादी संदेश देण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात स्त्रीभ्रुण हत्या, अंधश्रद्धा, साक्षरता, स्वच्छता अभियानावर एकांकिका सादर करण्यात आली. संचालन जी.के. पारधी व आभार प्रदर्शन धामणकर, ओ.जे. कटरे यांनी केले. स्नेहसंमेलनासाठी सांस्कृतिक प्रभारी एस.डी.भंडारकर व एस.एस. यादव क्रींडा प्रभारी, बौद्धिक प्रभारी, शिक्षक व विद्यार्थी प्रतिनिधी मंडळ व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)