शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

संपकाळातील तीन दिवसाचे वेतन मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 01:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचे तीन दिवसाचे वेतन जि.प.चे मुख्य ...

ठळक मुद्देरहांगडाले यांच्या प्रयत्नांना यश: महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचे तीन दिवसाचे वेतन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी कपात केले होते. परंतु यासंदर्भात तिरोडा गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आ. विजय रहांगडाले यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली. त्यावर संप काळातील तीन दिवसाचे वेतन देण्यात यावे असे आदेश शिक्षण मंत्र्यांनी मुकाअ यांना दिले.७ आॅगस्ट २०१८ ते ९ आॅगस्ट २०१८ पर्यंत तीन दिवसीय संपूर्ण राज्य कर्मचाºयांनी प्रलंबित मागण्यांबाबत राज्यस्तरीय संप पुकारला होता. या संपामधील कर्मचाºयांच्या विविध मागण्यावर शासनातर्फे सकारात्मक भूमिका दर्शविल्यामुळे जिल्हा परिषद कर्मचाºयांनी ९ आॅगस्टला दुपारी १२ वाजता आपला संप मागे घेत १२ नंतर आपल्या कार्यस्थळी रुजू झाले होते.या संपाबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडून ६ आॅगस्ट २०१८ ला शासन परिपत्रकाद्वारे संपामध्ये सहभागी कर्मचाºयांना संप न होण्याकरिता उपाययोजना करण्याबाबत सूचित केल्याचे निदर्शनास आले आहे.शासन परिपत्रकाच्या आधारावर मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.गोंदिया यांनी संप कालावधीमध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचे तीन दिवसाचे वेतन कपात करण्याबाबत सर्व विभागाला पत्र दिले. संप काळातील कर्मचाऱ्यांचे तीन दिवसाचे वेतन कपातीबाबतचे मुकाअ यांचे आदेश रद्द करण्यात यावे व संपात सहभागी जि.प. कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावा, ही मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विरेन्द्रकुमार कटरे, सरचिटणीस अनिरूध्द मेश्राम, नूतन बांगरे, उमाशंकर पारधी, सुधिर बाजपेयी, केदार गोटेफोडे, हेमंत पटले, नागसेन भालेराव, यशोधरा सोनवाने, वाय. डी. पटले, मोरेश बडवाईक, नरेन्द्र आगाशे, सुशिल रहांगडाले, अमोल खंडाईत, विजय डोये, दिनेश बोरकर, आर.एस.संग्रामे, दुर्गाप्रसाद कोकोडे, विनोद चौधरी, डी.बी.लांजेवार, सुरेश रहांगडाले, मयूर राठौर, जी.जी.खराबे, तोषिलाल लिल्हारे, शंकर नागपूरे, योगेश्वर मुंगुलमारे, शंकर चव्हाण, पवन कोहळे, श्रीधर पंचभाई, पी.के. पटले, एन.जे. डहाके यांनी सतत लावून धरली होती.या मागणीवर आ. विजय रहांगडाले यांनी पुढाकार घेऊन मंजूर करवून घेतली. या संदर्भात मुकाअ व शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्या सोबत चर्चा करण्यात आली.