शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

कोविड लसीकरणाबाबतचे गैरसमज करणार दूर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:42 IST

गोंदिया : कोरोना महामारीवर मात करण्यासाठी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचा वापर प्रभावीपणे करीत राहणे ...

गोंदिया : कोरोना महामारीवर मात करण्यासाठी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचा वापर प्रभावीपणे करीत राहणे आवश्यक आहे. आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत लसीकरणाची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेला चित्ररथ जिल्ह्यात प्रभावी कामगिरी बजावेल. कोरोना लस ही सुरक्षित असून कुणीही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे अधिनस्त क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, नागपूर यांच्या उपक्रमांतर्गत कोविड-१९ लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर गोंदिया जिल्ह्यातील विविध तालुक्यात जनजागृतीसाठी तयार केलेल्या बहुमाध्यमी मोबाईल व्हॅनवरील फिरत्या प्रदर्शनाचा तसेच कलापथक मोहिमेचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. निवासी जिल्हा अधिकारी जयराम देशपांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबरीश मोहबे, जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. सुशांकी कापसे, केटीएसच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात १६ व्हॅन्सव्दारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शन आयोजित करून तसेच कलापथकांच्या माध्यमातून लोकांमध्ये कोविड लसीकरण मोहीम आणि आत्मनिर्भर भारत अभियानाबद्दल जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गोंदिया जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावांमध्ये १० दिवस व्हॅन्सव्दारे फिरत्या बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.

.....

लसीकरणाची माहिती पोहचविण्याचा प्रयत्न

या उपक्रमांतर्गत लसीकरणाबाबतची माहिती, आत्मनिर्भर भारत अंतर्गत विविध उपक्रम आणि कोविडविषयक नियमांबाबतची माहिती जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत पोहचविणे हा या मागील उद्देश आहे. लसीकरणाविषयी असलेले गैरसमज आणि अफवांबाबत जनतेला जागृत करणे, आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती या माध्यमातून दिली जाणार आहे.

.......

कलापथकातून जनजागृती

कलापथकातील कलाकारांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सादरीकरण करून लोकांपर्यंत जनजागृती संदेश पोहचविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जनजागृती मोहिमेसाठी जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाचे सहकार्य लाभले आहे. कलापथकाचे अवधूत पवार व त्यांच्या चमूचे सदस्य परिश्रम घेत आहेत.