शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे ‘मे हीट’पासून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:27 IST

गोंदिया : ‘मे हीट’ म्हटली की, भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी पळून जाते. यंदा मात्र ढगा‌ळ वातावरण व पावसाच्या आगमनामुळे जिल्ह्यातील ...

गोंदिया : ‘मे हीट’ म्हटली की, भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी पळून जाते. यंदा मात्र ढगा‌ळ वातावरण व पावसाच्या आगमनामुळे जिल्ह्यातील तापमान सामान्य राहिले व त्यामुळे ‘मे हीट’ तडाख्याचा जिल्हावासीयांना सामना करावा लागला नाही. विशेष म्हणजे, पुढील दिवसांतही आकाशात ढग दाटलेले राहणार व पावसाचाही हवामान खात्याचा अंदाज असल्याने, मे महिन्यातील पुढील दिवसही सामान्य तापमानातच जाणार, असे दिसत आहे.

उन्हाळा म्हणताच, अंगातून घामाच्या धारा निघतात. त्यातही मार्च व एप्रिल महिना कसा तरी निघून जातो. मात्र, सर्वाधिक तापणारा मे महिना कसा असणार, हा विचार करूनच अंगाची लाहीलाही होते. मे महिन्यात सूर्य सर्वाधिक तळपत असून, यालाच ‘मे हीट’ म्हटले जाते. मे महिन्यातील उन्हाचा तडाखा असहनीय राहत असून, कसातरी हा महिना निघून जावा, अशीच प्रार्थना सर्व करीत असतात. त्यातच सर्वाधिक तापणाऱ्या ९ दिवसांचा नवतपा मे महिन्यातच येत असल्याने, सर्वांच्या अंगाला थरकापच सुटतो.

यंदा मात्र, ढगाळ वातावरण व पावसाच्या आगमनाने जिल्ह्यात मे महिन्यात सूर्यदेव पाहिजे तसे तापले नाही. परिणामी, मे महिन्यात पडणाऱ्या उन्हाच्या तडाख्यापासून जिल्हावासीयांची सुटका झाली. जिल्ह्यातील तापमान बघितले असता, ४० अंश सेल्सिअसच्या आतच दिसून आले. म्हणजेच, दरवर्षी ४० पार जाणारा पारा यंदा सामान्य राहिल्याचे दिसले व त्यामुळे मे महिना थंडाथंडाच निघाला.

-----------------------------

नवतपालाही ढगाळ वातावरणाचा थंडावा

२५ मेपासून नवतपा सुरू होत आहे. नवतपातील ९ दिवस सर्वाधिक तापणारे राहात असल्याने, या ९ दिवसांना नवतपा म्हटले जाते. म्हणूनच नवतपा म्हणताच सर्वांच्याच भुवया उंचावतात. मात्र, यंदा नवतपातही आकाशात ढग दाटलेले राहतील व पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. परिणामी, पारा सामान्य तापमानात राहणार असल्याचा अंदाज आहे.