शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2017 01:30 IST

तालुक्यातील ग्राम बाघोली येथील नऊ शेतकऱ्यांच्या शेतातून विना परवानगी पांदणरस्ता तयार करण्यात आला.

दोषींवर कारवाई करा : शेतकरी पटले यांचा आत्मदहनाचा इशारा लोकमत न्यूज नेटवर्क गोरेगाव : तालुक्यातील ग्राम बाघोली येथील नऊ शेतकऱ्यांच्या शेतातून विना परवानगी पांदणरस्ता तयार करण्यात आला. हा पांदण रस्ता रेकॉर्ड वर नसताना व शेतकऱ्यांना याची गरज नसताना कुठलाही मोबदला न देता तयार करण्यात आल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तर या कामावर न जाणाऱ्या मजुरांची नावे टाकून शासनाच्या निधीचा दुरुपयोग करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत दोषींवर १९ मे पर्यंत कार्यवाही करा अन्यथा २० मे रोजी आत्मदहन करण्याचा इशारा शेतकरी रुपचंद पटले यांनी मुख्यमंत्री व अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. बाघोली येथील शेतकरी मंगरु राणे ते इंद्रराज पटले यांच्या शेतापर्यंत मे २०१६ मध्ये मग्रारोहयो अंतर्गत पांदणरस्ता तयार करण्यात आला. रेकॉर्डमध्ये या पांदण रस्त्याची नोंद नाही. यापुर्वी यांच्याच शेतातून कालवा गेला व आता पांदन रस्ता गेल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेताचे तीन तुकडे झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. पांदनरस्त्याचे काम सुरु होताच शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत व पंचायत समितीमध्ये काम बंद करावे अशी तक्रार नोंदवून सुद्धा दखल घेण्यात आली नाही व रस्ता पूर्ण करण्यात आला. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी न्याय मागण्यासाठी अनेक तक्रारी करुन मोबदला मागितला. या कामात शेतकऱ्यांच्या घरच्या व गावातील कामावर न जाणाऱ्या २० ते २५ मजुरांची नावे घालून त्यांना बँक खात्यावर जमा झालेली मजुरी परत मागण्यात आली व शासनाच्या निधीचा दुरुपयोग करण्यात आला. ही बाब अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून देऊन सुद्धा ग्राम रोजगार सेवकावर अंगणवाडी मदतनीसच्या नावाने सात हजार २१४ रुपये काढल्याचा ठपका ठेऊनही रक्कम वसूल करुन ग्रामसभेच्या माध्यमाने कार्यवाहीचा आदेश देण्यात आला. पण या कामावर झालेला मोठा भ्रष्टाचार दाबल्याचा प्रयत्न उघडपणे दिसून सुद्धा प्रकरणात डोळे झाक होत आहे. यात नऊ शेतकऱ्यापैकी मंगरु चन्ने, नारायण राणे, जायाबाई सोनवाने, रुपचंद हरिचंद पटले, देवचंद हरिचंद पटले, रामचंद पटले, अनंतराम पटले, इंद्रराज पटले या आठ शेतकऱ्यांनी आपल्या गेलेल्या जमिनीचा मोबदला मागितला पण संबंधित अधिकारी व कर्मचारी टाळाटाळ करीत असून थातूर-मातूर चौकशी करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत आहे. शासनाने मजुरांना काम मिळावे म्हणून मग्रारोहयोची कामे सुरु करुन नियमाच्या अधीन राहून कामे सुरु करण्याचा आदेश असताना सुद्धा नियम व कायद्याला डावलून मग्रारहोयोची कामे धडाक्यात सुरु आहे. यात कामावर भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे शासनाचा निधी व्यर्थ वाया जात आहे. असाही आरोप त्यांनी केला आहे. यासर्व कामाची पुन्हा चौकशी आयुक्तामार्फत शेतकरी व गावकऱ्यांपुढे क रून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दयावा व दोषींवर कार्यवाही करावी असे निवेदन मुख्यमंत्री व अधिकाऱ्यांना देण्यात आले. कार्यवाही न झाल्यास २० मे ला आत्मदहन करणार असा शेतकरी पटले यांनी इशारा दिला आहे.