शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘कचरागाडी’ बनल्या जनजागृतीचे माध्यम

By admin | Updated: October 3, 2016 01:30 IST

नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या भरवशावर शहर स्वच्छ होणार नसून प्रत्येकाचा यासाठी सहभाग आवश्यक आहे.

गाड्यांना लावले ‘म्युझिक सिस्टम’ : स्वच्छता जनजागृतीसाठी पालिकेचा प्रयोग कपिल केकत  गोंदियानगर परिषद कर्मचाऱ्यांच्या भरवशावर शहर स्वच्छ होणार नसून प्रत्येकाचा यासाठी सहभाग आवश्यक आहे. करिता शहरवासीयांत जाणीव व उत्साह निर्माण करीत जनजागृती व्हावी या उद्देशातून नगर परिषदेने आपल्या कचरागाडींना ‘म्युझिक सिस्टम’ लावले आहेत. स्वच्छतेचा संदेश देणारी गीते या ‘म्युझिक सिस्टम’वर सुरू असतात. नगर परिषदेच्या या नव्या प्रयोगाचे शहरवासीयांकडून कौतूक होत असल्याचेही दिसून आले. आपला परिसर स्वच्छ असावा या उद्देशातून स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेवर भर दिला जात आहे. महात्मा गांधींच्या जयंतीचे निमित्त साधून देशात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह सामाजीक संघटना, शाळा-महाविद्यालय व सामान्य नागरिकांचा सहभाग लाभत आहे. या स्वच्छता अभियानांतर्गत नगर परिषदेक डून २६ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर दरम्यान स्वच्छता आठवडाही साजरा करण्यात आला. दरम्यान स्वच्छचा अभियानाचे हे दुसरे वर्ष असल्याने यंदाही रविवारी (दि.२) नगर परिषदेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विशेष म्हणजे स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे हे नागरिकांच्या मनावर ठासवून देण्याची गरज आहे. यासाठी त्यांच्यात जाणीव व उत्साह निर्माण करण्याची गरज आहे. याकरिताच शासनाने लोकांत जनजागृती करता यावी यासाठी संगीत एक माध्यम म्हणून निवडले. त्यानुसार नगर परिषदेने त्यांच्याकडील कचरागाड्यांना ‘म्युझिक सिस्टम’ लावले असून या कचरागाड्या आता जनजागृतीचे माध्यम बनल्या आहेत. या कचरागाड्या शहरात निघत असताना त्यात सरू असलेली स्वच्छतेचा संदेश देणारी गीते नागरिकांना आकर्षित करीत आहेत. यातून नागरिकांत स्वच्छतेबाबत जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे कचरागाडी शहरात फिरत असताना नागरिक थांबून उत्सुकतेने हा प्रकार बघत असून पालिकेच्या या प्रयोगाचे कौतूकही केले जात असल्याचे दिसले. म्हणूनच नगर परिषदेच्या कचरागाड्या स्वच्छतादूताचे काम करीत असल्याचे बोलले जात आहे.