शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

भारतात पहिली पीएचडी पदवी जीडीबी कृष्णराव यांनी मिळविली ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:00 IST

देवरी : या जगामध्ये सर्वप्रथम ग्रंथालय शास्त्रज्ञ शिक्षणाची सुरुवात अमेरिकेत सन १८८७ मध्ये मेलवील ड्यूई यांच्याद्वारे करण्यात आली. नंतर ...

देवरी : या जगामध्ये सर्वप्रथम ग्रंथालय शास्त्रज्ञ शिक्षणाची सुरुवात अमेरिकेत सन १८८७ मध्ये मेलवील ड्यूई यांच्याद्वारे करण्यात आली. नंतर भारतात सन १९११ मध्ये बडोद्यात महाराज गायकवाड (तिसरे) यांच्या प्रयत्नामुळे प्रारंभ झाले. भारतात ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांनी ग्रंथालय शास्त्राची आधारशिला रोवली. सन १९५७ मध्ये भारतात पहिली पीएचडी पदवी जीडीबी कृष्णराव यांनी मिळवून देऊन विद्यापीठाचे नावलौकिक केले, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप पुरस्कृत, ग्रंथमित्र ॲड. डॉ. श्रावण उके यांनी केले.

देवरी येथील श्रीमती कमलादेवी स्वरूपचंद जैन विद्यालयात शनिवारी आयोजित ८० ग्रंथ वितरण व सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील एम.बी. पटेल महाविद्यालयातील अर्थशास्त्र प्रमुख प्राध्यापिका डॉ. वर्षा गंगणे या होत्या. याप्रसंगी देवरीचे अधिवक्ता तथा नोटरी ॲड. प्रशांत संगीडवार, के.एस. जैन विद्यालयाचे प्राचार्य रजिया बेग व सत्कारमूर्ती ॲड. डॉ. श्रावण उके व त्यांचे कुटुंबीय यांचे स्वागतगीताने आणि पुष्पगुच्छाने स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी ८० व्या वाढदिवसानिमित्त सत्कारमूर्ती ॲड. डॉ. श्रावण उके यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. उके यांनी विद्यार्थ्यांना ८० पुस्तकांचा संच भेट म्हणून दिला. प्रास्ताविक प्राचार्य रजीया बेग यांनी केले तर संचालन प्रा. नरेश पटले यांनी व आभार योगराज बिसेन यांनी मानले.