शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रतापगडावर फुलणार भक्तांचा मेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 21:08 IST

नवसाला पावणारा शिवशंकर अशी सर्वदूर ख्याती असलेल्या पूर्व विदर्भातील प्रतापगड येथे सोमवारी (दि.४) भक्तांची अलोट गर्दी होणार आहे. सुमारे ५ लक्ष भाविक हजेरी लावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या दृष्टीने प्रशासनाची जय्यत तयारी झालेली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची जय्यत तयारी : ५ लक्ष भाविक घेणार दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : नवसाला पावणारा शिवशंकर अशी सर्वदूर ख्याती असलेल्या पूर्व विदर्भातील प्रतापगड येथे सोमवारी (दि.४) भक्तांची अलोट गर्दी होणार आहे. सुमारे ५ लक्ष भाविक हजेरी लावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या दृष्टीने प्रशासनाची जय्यत तयारी झालेली आहे. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून जत्थेच्या जत्थे येण्यास रविवारपासूनच सुरुवात झाली आहे.गोंदिया जिल्ह्यातील प्रतापगड हे हिंदू-मुस्लीम जनतेच्या ऐक्याचे प्रतिक आहे. हिंदू भाविक हे महादेवाचे तर मुस्लिम बांधव हजरत ख्वाजा उस्मान गणी हारुणी यांचे दर्शन घेतात. एकाचवेळी हिंदू मुस्लीम भाविक येत असल्याने येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.यावेळी राजकीय पक्षाची नेतेमंडळी सुद्धा हजेरी लावून महाप्रसादाचे वितरण करतात. यामुळेच महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची सुविधा रविवारपासूच करण्यात आली आहे.प्रतापगड यात्रेच्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी गावाबहेर ३ ठिकाणी वाहने अडविली जातात. त्याठिकाणी पार्र्कींगची सुविधा असते. त्यामुळे भाविकांना बरेच अंतर पायपीट करीत मार्गक्रमण करावे लागते.ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो. गैरकृत्य करणाऱ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी महत्वाच्या ठिकाणी सीसी टिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सुकडी (खैरी) ते प्रतापगड या मार्गाने वाहनांची वर्दळ अधिक असल्याने अनेकदा खोळंबा निर्माण होतो.यात्रेकरुंचे आरोग्य जपण्यासाठी यावर्षी ७ ठिकाणी वैद्यकीय कॅम्प लावण्यात येणार आहेत. यात सीतागाई न्हाणी, पहिली पायरी, महादेव मंदिर, दर्गा, बसस्थानक तसेच पहाडावरील महादेव मंदिरात जागा उपलब्ध नसल्याने त्याठिकाणी एका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तैनात असणार आहे. तर दर्ग्याखाली एक मेडीकल मोबाईल युनिट असणार आहे. परिवहन महामंडळातर्फे साकोली, गोंदिया, तिरोडा, तुमसर, भंडारा व पवनी येथून बसेसची व्यवस्था आहे.मंगळवारी (दि.५) दुपारी ३ वाजता शाही संदल प्रमूख मार्गाने मार्गक्रमण करीत ख्वाजा उस्मान गणी हारूनी यांच्या दर्ग्यावर पोहचेल. रात्री ९ वाजता कव्वालीचे आयोजन केले आहे.यावेळी सीमा सदू ताज, किरण जोशी (अमरावती), अनूज जाफर (बालाघाट) अंतू झकास, मनोज पाराशर (वाराशिवणी), युसूफ सागर (भिलाई) उपस्थित राहणार आहेत. हाजी अब्दूल मजीद शोला व मुंबईचे जाहिद नाजा यांची कव्वाली होणार आहे.गुरूवारी सकाळी ९ वाजता लंगर (महाप्रसाद) वितरण होणार आहे.

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्री