शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

गेट मिटींग, शासन विरोधी प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 22:07 IST

प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे व्यवस्थापनाचे दुर्लक्ष असून त्यावर कुठलाच तोडगा काढण्यात आलेला नाही. आपल्या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे.

ठळक मुद्देएमएसई वर्कर्सचे फेडरेशनचे आंदोलन : प्रलंबित मागण्यांसाठी लढा सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे व्यवस्थापनाचे दुर्लक्ष असून त्यावर कुठलाच तोडगा काढण्यात आलेला नाही. आपल्या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. एमएसई वर्कर्स फेडरेशनच्यावतीने मंगळवारी (दि.१९) महावितरण कार्यालयासमोर गेट मिटींग घेऊन शासन व व्यवस्थापन विरोधी नारेबाजी करून प्रदर्शन करण्यात आले.महावितरण, महापारेषण व महाजेनको या तिन्ही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित असून कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.कित्येकदा व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यात आले, विविध स्तरावर व्यवस्थापनाशी वाटाघाटी केल्या. मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांत रोष व खदखदत आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेतला. यासाठी ९ नोव्हेंबर रोजी शासन व व्यवस्थापनास नोटीस देण्यात आली होती.या आंदोलनांतर्गत फेडरेशनच्या वतीने ५ डिसेंबर रोजी विभागीय कार्यालयासमोर, १२ डिसेंबर रोजी सर्कल कार्यालयासमोर व मंगळवारी (दि.१९) झोन कार्यालयासमोर गेट मिटींग घेऊन कामगार जागृती तसेच शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. याप्रसंगी कर्मचाऱ्यांनी शासन व व्यवस्थापनाविरोधात जोरदार नारेबाजी करून आपला रोष व्यक्त केला.याप्रसंगी फेडरेशनचे विवेक काकडे, मंगेश माडीवाले, नरेंद्र डोळस, नितीन नखाते, प्रितम राऊत, विलास वाढई, हिवरकर, रोहीत रामटेके, प्रदीप भोयर, डी.बी.शेंडे, मारोती भोयर, सुभाष बंसोड, पंकज कटकवार, सुरेखा सत्तार, सी.के.चिंधालोरे यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.संचालन विभागीय सचिव अशोक ठवकर यांनी केले. आभार विभागीय सचिव विनोद चौरागडे यांनी मानले.या आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्याविभाजनानंतर गठीत झालेल्या महावितरण कंपनीचे अधिक तुकडे पाडून खासगीकरण व फ्रेंचाईसीकरणाचे धोरण रद्द करण्यात यावे. खात्यामार्फत सुधारणा घडवून आणणे, सर्व कर्मचारी, अभियंते व अधिकाºयांना पेंशन योजना लागू करणे, कंत्राटी आऊटसोर्स व सुरक्षा रक्षकांना कायम करून त्यांच्या वेतनात तातडीने वाढ करणे, मृतक कामगारांच्या सर्व वारसांना तातडीने नोकरीत सामावून घेणे, महावितरण कंपनीतील कामगारांकरिता स्टॉफ सेटअपवर चर्चा करून निश्चीती करणे व सर्व रिक्त जागांवर कामगारांची भरती करून कामगारांचे कामाचे तास व जबाबदारी ठरवून देणे, कंत्राटीकरण धोरण रद्द करणे, फोटो, रिडींग, बिल वाटप, वीज बिल कलेक्शन या महसुलाच्या स्त्रोतांमधील कंत्राटीकरण रद्द करून महसुलाची सर्व कामे खात्यामार्फत कायम कामगारांद्वारे करणे, वीज बिलांची वाढलेली थकबाकी वसुल करण्यासाठी स्वतंत्र योजना उभी करावी, गुप्त मतदानाने संघटनेस मंजूरी द्यावी अशा एकूण २१ मागण्यांचा समावेश आहे.गुरूवारी मुंबई येथे धरणे आंदोलनफेडरेशनच्यावतीने सुरू असलेल्या या राज्यव्यापी आंदोलनांतर्गत मंगळवारी (दि.१९) गेट मिटींगच्या माध्यमातून सुरू असलेले आंदोलन संपले. त्यानंतर आता मात्र येत्या गुरूवारी (दि.२८) तिन्ही कंपन्यांचे मुंबई येथील मुख्य कार्यालय प्रकाशगड व प्रकाशगंगा समोर कर्मचारी धरणे आंदोलन करणार आहेत.