जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गॅस वितरण : आणखीही गावकऱ्यांना मिळणार लाभपांढरी : गोंगले ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बकीटोला गट ग्रामपंचायत येथीाल गावकऱ्यांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गावकऱ्यांना गॅस वितरण करण्यात आले असून येथील आदिवासीबांधवही आता गॅसधारक झाले आहेत. संयुक्त वनसमितीच्या माध्यमातून गुरूवारी (दि.२३) गॅस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, जनार्धन राठोड, डी.यू. रहांगडाले, दामिनी गावळ, अविनाश काशिवार, प्रमिलाध भोयर, दामोदर बोपचे, देवराम रहांगडाले, सुनंदा मेश्राम, सल्लू पठान, प्यारेलाल रहांगडाले, पोलीस उपनिरीक्षक केशव वाबळे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, पी.एस. कुंभरे, पुरनलाल रहांगडाले, वरिष्ठ शल्य चिकीत्सक डॉ. राजेंद्र जैन, शिला चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात माता शारदा व भारतमाता यांच्या प्रतिमेची पूजा-अर्चना करुन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी या शाळेतील विद्यार्थी यांनी गोंडी नृत्य सादर करण्यात आले. या बकीटोलामध्ये जास्त प्रमाणात आदिवासी बांधव वास्तव करीत असतात. गोंगले ग्रामपंचायतला बकीटोला, भोयरटोला व पैकनटोली अशा प्रकारे लहान लहान तीन टोल्या मिळून बकीटोेला गट ग्रामपंचायत बनविण्यात आली आहे. या ग्रामपंचायतमध्ये २५ वर्षापासून निवडणूक लढविण्यात आले नाही ? म्हणजे अविरोध निवडणूक घेण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान जिल्हाधिकारी काळे व उपवनसंरक्षक रामगावकर यांच्या हस्ते १६९ लाभार्थ्यांना गॅस वितरण करण्यात आले. गोरेगावच्या गायत्री भारतगॅस एजन्सी यांच्या माध्यमातून ७५ टक्के अनुदानावर वाटप करण्यात आले. तर येत्या काही दिवसांत आणखीही गावकऱ्यांना गॅस वितरण केले जाणार असल्याची माहिती रामगावकर यांनी दिली. विशेष म्हणजे, याच कार्यक्रमामध्ये तहसील कार्यालयाच्या माध्यमातून ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यात गावकरी व शेतकरी बांधवांच्या समस्या जाणून घेत तहसीलदार परळीकर यांनी त्यांचे निराकरण केले. (वार्ताहर)जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडल्या मागण्या प्रास्ताविक भाषणात पुरनलाल रहांगडाले यांनी गोंगले ते बकीटोला रस्त्यावरील पुलाची उंची कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांन शाळेत जाताना अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे पुलाची उंची वाढविण्याची, प्रेत जाळण्याकरिता शेडची मागणी केली. तसेच शेजारी नागझिरा अभयारण्य लागले असल्यामुळे प्राणी कडधान्याचे नुकसान करीत असतात. त्यामुळे सौर दिवे अथवा तारांचा बंदोबस्त करण्याची मागणी डी.यू. रहांगडाले यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)
बकीटोलावासीय झाले गॅसधारक
By admin | Updated: March 26, 2017 00:52 IST