शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीच्या काळात गॅस सिलिंडरचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 21:42 IST

ऐन दिवाळीच्या तोंडावर गॅस सिलिंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गॅस सिलिंडरचा दर १०३४ रुपयांवर गेल्याने जिल्ह्यातील दोन लाख ग्राहकांना याचा फटका बसला आहे. तर वाढत्या दरामुळे गृहीणीचे बजेट बिघडले आहे.

ठळक मुद्देगृहीणींचे बजेट बिघडले : दोन महिन्यात हजाराचा आकडा पार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ऐन दिवाळीच्या तोंडावर गॅस सिलिंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गॅस सिलिंडरचा दर १०३४ रुपयांवर गेल्याने जिल्ह्यातील दोन लाख ग्राहकांना याचा फटका बसला आहे. तर वाढत्या दरामुळे गृहीणीचे बजेट बिघडले आहे. पेट्रोल व डिझेल पाठोपाठ गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्याचे जगणे कठीण झाले आहे.केंद्र शासनाने जंगलतोडीला आळा घालण्यासाठी चुलीच्या धुरापासून महिलांना मुक्ती देण्यासाठी उज्ज्वला योजनेतंर्गत अनुदानावर गॅस कनेक्शन उपलब्ध करुन दिले. त्यामुळे गोरगरिबांना दिलासा मिळाला. मात्र गॅस सिलिंडर भरण्यासाठी आता या योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरसाठी एक हजार रुपये मोजावे लागत असल्याने त्यांना देखील आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे गॅस कनेक्शन मिळून सुध्दा त्याचा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात एकूण १ लाख ९५ हजार गॅस सिलिंडरधारक ग्राहक आहेत. यात उज्ज्वला योजनेच्या ५५ हजार लाभार्थी आहेत. आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात गॅस सिलिंडरची मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र नोव्हेंबर महिन्यात गॅस सिलिंडरचे दर १०३४ रुपयांवर पोहचले. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गॅस सिलिंडरवर शासनातर्फे अनुदान दिले जात असले तरी सुरूवातीला ग्राहकांना पूर्णपणे पैसे मोजावे लागणार आहे. त्यामुळे गृहीणीचे बजेट बिघडले आहे. आधीचे पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरामुळे भाजीपाला व किराणा सामानाचे दर वाढले आहे. त्यातच गॅस सिलिंडरच्या दराचा भडका झाल्याने याचा जिल्ह्यातील दोन लाख ग्राहकांना फटका बसला आहे.