शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडर वाहून नेणाऱ्या वाहनाने बालकाला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:23 IST

गॅस सिलिंडर वाहून नेणाऱ्या वाहनाने एका पाच वर्षीय बालकाला चिरडल्याची घटना सोमवारी (दि.२६) सकाळी ९ वाजताच्या सुमारास गोंदिया तालुक्यातील धामनेवाडा येथे घडली.

आॅनलाईन लोकमतएकोडी : गॅस सिलिंडर वाहून नेणाऱ्या वाहनाने एका पाच वर्षीय बालकाला चिरडल्याची घटना सोमवारी (दि.२६) सकाळी ९ वाजताच्या सुमारास गोंदिया तालुक्यातील धामनेवाडा येथे घडली. धनंजय जयेन्द्र मरकाम (५) रा. धामनेवाडा असे मृत बालकाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास गायधने एन.पी.गॅस एजन्सीची पिकअप वाहन गॅस सिलिंडर भरून धामनेवाडा येथे वितरित करण्यासाठी जात होती.गावात गाडी पोहोचल्यानंतर गावाच्या नागमोडी वळणावर वाहन चालकाच्या निष्काजीपणामुळे धनंजयच्या दोन्ही पायावरुन गाडी गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. एच.पी. गॅस एजन्सीच्या गाड्या गॅसचे सिलिंडर वितरित करण्याकरीता दररोज परिसरातील गावात जातात. अनेकदा परिसरातील नागरिकांककडून गाड्यांचा वेग कमी ठेवण्यास वाहन चालकाला सांगितले होते. तर याबाबत अनेकांनी सिलिंडर भरून आलेली गाडी गावातून वेगाने चालवित असल्याच्या तक्रारी सुद्धा एजन्सी मालक यांच्याकडे गावकºयांनी केल्याची माहिती आहे.या घटनेनंतर गावकऱ्यांनी वाहन चालकाविरुध्द रोष व्यक्त केला. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील लोकप्रतिनिधींनी प्राथमिक आरोग्य केंद्र एकोडीला भेट देत मृतकाच्या आईवडील व नातेवाईकांचे सात्वन केले. गावकऱ्यांनी यावेळी मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची केली. तसेच वाहन चालकावर कठोर कारवाईची मागणी केली.गंगाझरी पोलिसांनी मौका चौकशी करुन वाहन चालक जयप्रकाश मोतीलाल गायधने (२३) रा. गंगाझरी यांच्याविरुद्ध भादंविच्या ३०४ अ, २७९ व १८४ अन्वये गुन्हा दाखल केला. तपास ठाणेदार शितल जाधव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.