शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

-तर गोंदियाला डेंग्यु-मलेरियाचा विळखा

By admin | Updated: July 31, 2016 00:17 IST

शहरातील घाणीच्या समस्येवर तोडगा निघण्याची चिन्हे काही केल्या दिसत नाहीत. शहरात बघावे तिकडे घाणीचे ढिग लागलेले आहेत.

बघावे तिकडे कचऱ्याचे ढीग गोंदिया : शहरातील घाणीच्या समस्येवर तोडगा निघण्याची चिन्हे काही केल्या दिसत नाहीत. शहरात बघावे तिकडे घाणीचे ढिग लागलेले आहेत. मान्सूनपूर्व सफाईचाही काहीच फायदा जाणवत नाही. नाल्यांची स्थिती होती तीच आहे. परिणामी शहराला लागलेला घाणीचा विळखा कायम आहे. ही स्थिती अशीच कायम राहिली तर डासांचा प्रादुर्भाव आणखी वाढून शहरवासीयांना डेंग्यु, मलेरियाच्या आहारी जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळा हा आजारांचा काळ असतो. जलजन्य व संसर्गजन्य आजार या काळात झपाट्याने पसरतात. परिणामी पावसाळ््यात पाहिजे तेवढी स्वच्छता व त्यासोबतच सावधानी बाळगण्याचा सल्ला डॉक्टरही देतात. त्यानुसार नागरिक आपल्या घरातील स्वच्छेवर जोर देऊन ती पाळू लागतात. मात्र गोंदिया शहरातील स्वच्छतेवर कोणाचेच नियंत्रण चालत नाही. परिणामी त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. शहरात बघावे तिकडे कचऱ्यांचे ढिग लागलेले दिसत आहेत. अन्य काळात ही बाब तेवढी गंभीर वाटत नाही. मात्र पावसाळ््यात घाणीमुळे आजारांचा धोका वाढतो. आज शहरातील प्रत्येकच भागात घाणीचे ढिगार दिसून येत आहेत. यातून शहरवासीयांचे आरोग्य कितपत सुरक्षित आहे याची प्रचिती येते. शिवाय नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाची कर्तव्यतत्परता सुद्धा यातून नजरेत येते. घाणीचे ढिगार, सांडपाण्याने तुंबलेल्या नाल्या या सर्व प्रकारामुळे शहरात एकतर नाक दाबून वावरावे लागत आहे. तसेच डासांचा प्रकोप वाढल्याने डेंग्यू व मलेरिया सारख्या आजारांच्या दहशतीत शहरवासी आपले दिवस घालवत आहेत. नगर परिषद मात्र उघड्या डोळ््याने हा प्रकार बघत असल्याने शहरवासीयांत रोष खदखदत आहे. (शहर प्रतिनिधी) यंत्रणा ठरतेय कुचकामी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडे २७२ स्थायी सफाई कर्मचारी व १८ रोजंदारी कर्मचारी आजघडीला कार्यरत आहेत. तसेच निघालेल्या कचऱ्याची उचल करण्यासाठी नगर परिषदेचे सहा तर भाड्याने घेतलेले सहा ट्रॅक्टर आहेत. यातील एक ट्रॅक्टर बाजार भागासाठी असून दिवसातून तीन ट्रीप मारतो. १० ट्रॅक्टर शहरातील प्रभागांत जातात. तर एक ट्रॅक्टर इमरजंसी सेवेसाठी असतो. एवढी सर्व ताफा असतानाही शहरातील स्थिती बघता हे सर्व काही कुचकामी ठरत असल्याचेच दिसून पडते. कारण एवढे मनुष्यबळ व वाहने असतानाही शहर बकाल झाले आहे. मान्सूनपूर्व सफाई अभियान अयशस्वी पावसाळा सुरू होण्यापूर्वी नगर परिषदेकडून कचरा व नाल्यांची सफाई करण्यासाठी मान्सूनपूर्व सफाई अभियान राबविले जाते. विशेष म्हणजे यासाठी काही कर्मचारी व वाहन कंत्राटी तत्वावर घेतले जातात. या अभियानांतर्गत शहरातील मोठे नाले, अंतर्गत लहान नाल्यांची सफाई, त्यातील गाळ काढून बंद पडलेल्या नाल्या मोकळ््या करणे आदी कामे केली जातात. मात्र शहरातील कित्येक नाल्यांची सफाईच झालेली नसून त्या चोक पडून असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. यातून मान्सूनपूर्व सफाई अभियान फेल ठरल्याचेच दिसते.