शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
2
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
3
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं करण कळताच पती हादरला!
4
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
5
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
6
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
7
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
8
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
9
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
10
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
11
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
12
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
13
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
14
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
15
Mumbai: विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेची जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव
16
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
17
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
18
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
19
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
20
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे

उमेदवारांच्या आयात निर्यातीचा खेळ

By admin | Updated: June 25, 2015 00:45 IST

तालुक्यातील चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समितीच्या जागेसाठी मैदानात उतरलेल्या उमेदवारांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

विद्यमान सदस्यांना डावलले : काहींची बंडखोरी तर काहींचा पक्षबदलविजय मानकर सालेकसा तालुक्यातील चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समितीच्या जागेसाठी मैदानात उतरलेल्या उमेदवारांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. काही पक्षांनी त्यांच्या आवडीनुसार उमेदवार आयात-निर्यातीचा खेळ खेळला आहे. विशेष म्हणजे विद्यमान जि.प. किंवा पं.स. सदस्यांना कुठेही पुन्हा उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे एक दोन ठिकाणी पक्ष बदलून किंवा बंडखोरी करुन ते उमेदवार निवडणूक मैदानात पुन्हा आपले नशिब आजमावत आहेत. तर काही प्रमुख पक्षांनी उमेदवारांनाच आयात निर्यात करुन निवडणूक जिंकण्याचा डाव खेळला आहे.जि.प.च्या चार जागांपैकी झालीया आणि आमगाव खुर्दची जागा एस.टी.साठी आरक्षित असल्याने सर्व पक्षांना एकतर नवखे उमेदवार मैदानात उतरवावे लागले. किंवा बाहेरुन उमेदवार बोलवावे लागले. झालिया जि.प.क्षेत्राची जागा एस.टी.साठी राखीव झाल्याने विद्यमान जि.प. सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवकीबाई नागपुरे या बाद झाल्या. येथे या पक्षाने आमगाव खुर्द येथील बिसराम चर्जे यांना आयात केले आहे. या जागेवर पुन्हा आपला कब्जा जमविण्यासाठी भाजपाने पिपरीया क्षेत्रातील शंकर मडावी यांना आयात केले आहे. काँग्रेस पक्षाने स्थानिक म्हणून विजय टेकाम या नवख्याला उमेदवारी दिली आहे. शंकर मडावीक यांनी या पूर्वी १९९७ मध्ये पिपरीया व झालीया एकत्रित असलेल्या कावराबांध जि.प.क्षेत्रातून काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यामुळे त्यांना येथून निवडून येण्याची खात्री वाटत आहे. तर बिसराम चर्जे यांनी सुद्धा आमगाव खुर्द क्षेत्रातून प्रतिनिधीत्व केले आहे. आता मतदार बाहेरुन आलेल्या अनुभवी उमेदवाराला पसंती देतात की नवख्या, परंतु स्थानिक उमेदवाराला महत्व देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पिपरीया जि.प.क्षेत्रात यावेळी सर्वात रंगतदार निवडणूक होणार आहे. ही जागा सर्वसाधारण गटासाठी खुली असून या जागेवर सर्वच पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या जागेवर आमगाव खुर्द येथील दिग्गज उमेदवारांची निर्यात करण्यात आलेली आहे. यात भाजपने माजी सभापती ज्यांनी सर्वात जास्त पं.स.वर राज केले असे पुरुषोत्तम वशिष्ठ याचे पुत्र अजय वशिष्ठ यांना सालेकसावरुन पाठविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गोंदिया जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष दुर्गा तिराले यांना तर शिवसेनेने, तालुका शिवसेना प्रमुख कुलतारसिंह भाटीया यांची निर्यात केली आहे. मात्र काँग्रेस येथे ही नवख्या परंतु स्थानिक युवक ओमप्रकाश लिल्हारे यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान जि.प. सदस्य प्रेमलता दमाहे यांचा भाजपने पुन्हा विचार केला नाही. त्यामुळे त्यांचे पती राजकुमार दमाहे यांनी बंडखोरी कडून अपक्ष उतरण्यासाठी नामांकन भरले. आदिवासीबहुल या क्षेत्रात कोण बाजी मारेल याबद्दल सर्वत्र चर्चा चालल्या आहेत. या क्षेत्रात सर्वाधिक नऊ उमेदवार मैदानात आल्याने मतविभाजन होण्याची दाट शक्यता आहे. आमगाव खुर्द जि.प. क्षेत्रातून काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे एकूण तीनच उमेदवार रिंगणात उतरले आहेत. एस.टी.साठी राखीव असल्यामुळे या जागेवर तिन्ही पक्षांनी नवयुवकांना घरबसल्या उमेदवारी दिली आहे. भाजपने ग्रा.पं. सदस्य देवराज वडगाये तर काँग्रेसने सरपंच योगेश राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नितेश गावड यांना उमेदवारी दिली. ‘जो जिता वही सिकंदर’ सारखी परिस्थिती येथे दिसत आहे.कारुटोला जि.प.क्षेत्र महिला ओ.बी.सी. प्रवर्गासाठी राखीव असून येथे बोहरे आडनाव असलेल्या तीन महिला रिंगणात असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपकडून अनिता बोहरे, काँग्रेसकडून लता दोनोडे, राष्ट्रवादीकडून वंदना बोहरे या प्रमुख उमेदवार असून सर्व उमेदवार मात्र स्थानिक आहेत. आपआपल्या पक्षाचे मतदार रोखून ठेवणे येथे मोठे आव्हान मानले जात आहे. एकंदरित तालुक्यातील शिर्ष नेत्यांना सुद्धा पक्षासाठी प्रतिष्ठा पणाला लावावी लागत आहे.