शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘जय झुलेलाल’चा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 22:02 IST

सिंधी समाजाचे आद्य दैवत साई झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त येथील सिंधी समाजाकडून दरवर्षी प्रमाणे यंदाही शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत अवघे सिंधीबांधव सहभागी झाल्याने ‘जय झुलेलाल’च्या गजराने गोंदिया नगरी दुमदुमून गेली होती.

ठळक मुद्देशहरात निघाली शोभायात्रा : सिंधी समाजबांधवांच्या एकतेचे प्रतीक

आॅनलाईन लोकमतगोंदिया : सिंधी समाजाचे आद्य दैवत साई झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त येथील सिंधी समाजाकडून दरवर्षी प्रमाणे यंदाही शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत अवघे सिंधीबांधव सहभागी झाल्याने ‘जय झुलेलाल’च्या गजराने गोंदिया नगरी दुमदुमून गेली होती. सिंधी कॉलनीतून साई झुलेलाल यांची शोभायात्रा निघाली होती.सिंधी समाजाचे आद्य दैवत साई झुलेलाल यांचा जयंती दिवस सिंधी समाजबांधव मोठ्या धडाक्यात साजरा करतात. निमित्त शहरात सिंधी समाजाकडून शोभायात्रा काढली जाते. हजारोंच्या संख्येत सिंधीबांधवांच्या उपस्थितीत निघालेल्या या शोभायात्रेतील आकर्षक झाकींनी मन मोहून घेतले होते. सिंधी कॉलनीतून ढोल ताशांच्या गजरात व नाचत गात निघालेली ही शोभायात्रा शहरातील गांधी प्रतिमा, सिव्हील लाईन्स व बाजार परिसर होत मुख्य मार्गाने गेली. शोभायात्रेत ‘आयो लाल झुलेलाल’चा गजर करीत सिंधीबांधवांनी एकमेकांना साई झुलेलाल यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.या शोभायात्रेत एका रथामध्ये ज्योत ठेवण्यात आली होती व तो रथ सिंधी समाजबांधव ओढत होते. ही ज्योत म्हणजेच ‘बहराणा साहब’ असून या ज्योतचेच सर्वाधीक महत्व राहत असल्याने सर्व सिंधी बांधव ज्योतचे दर्शन घेत होते.चौकाचौकात खाद्यपदार्थ व पेयांची व्यवस्थाशहरात सिंधी समाजबांधवांची मोठी संख्या असून त्यांच्या आद्य दैवतांचा जयंती दिवस असल्याने शोभायात्रेत सहभागी बांधवांसाठी शहरातील चौकाचौकांत विविध खाद्यपदार्थांसह पेयांची व्यवस्था करण्यात आली होती. मोठ्या संख्येत सिंधी बांधवांसह अन्य बांधव या खाद्यपदार्थ व पेयांचा आस्वाद घेताना दिसले.बाजारपेठेत शुकशुकाटबाजारपेठेतील सुमारे ७० टक्के व्यापार सिंधी समाजातील आहेत. झुलेलाल जयंतीनिमित्त सिंधी नवयुवक सेवा मंडळाकडून दुकान बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शहरातील समस्त सिंधी बांधवांनी सोमवारी (दि.१९) आपले प्रतिष्ठान बंद ठेवले होते. त्यामुळे शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला.