शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भूमिगत गटार योजनेवरुन सर्वसाधरण सभेत गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 21:49 IST

शहरातील भूमिगत गटार योजनेचा विषय दिवसेंदिवस रेंगाळत चालला आहे. यामुळे शहरवासीयांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहराच्या दृष्टीने हा विषय महत्त्वपूर्ण असताना बुधवारी (दि.२५) आयोजित नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय ठेवण्यात आला नव्हता.

ठळक मुद्देआठ दिवसांनी पुन्हा विशेष सभा : न.प.ची सर्वसाधारण सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील भूमिगत गटार योजनेचा विषय दिवसेंदिवस रेंगाळत चालला आहे. यामुळे शहरवासीयांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहराच्या दृष्टीने हा विषय महत्त्वपूर्ण असताना बुधवारी (दि.२५) आयोजित नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय ठेवण्यात आला नव्हता. त्यामुळे यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व बसपाच्या सदस्यांनी आक्रमक होत यावरुन अध्यक्षांना जाब विचारला. त्यामुळे सभेत काही वेळ चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान सदस्य आक्रमक झाल्याने अध्यक्षांनी आठ दिवसांनी विशेष सभा बोलावून त्यात हा विषय ठेवण्याचे आश्वासन दिले.१८ जुलैला तहकुब झालेली सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.२५) दुपारी १२ वाजता नगर परिषद सभागृहात नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली होती. या सभेत मागील सभेतील विषय ठेवण्यात आले होते. सभेला सुरुवात होवून ठेवण्यात आलेले विषय वाचून दाखविण्यात आले. मात्र यात केवळ चारच विषय ठेवण्यात आले होते. यातून भूमिगत गटार योजनेचा पाचवा विषय वगळण्यात आला होता. यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व बसपाच्या सदस्यांनी आक्रमक होत भूमिगत गटार योजनेचा विषय का वगळण्यात आला. शहराच्या दृष्टीने हा विषय महत्त्वपूर्ण असताना नगराध्यक्षांना हा विषय महत्त्वाचा वाटत नाही का, शहरातील सांडपाण्याची व्यवस्था योग्य होत नसल्याने थोडासाही पाऊस झाल्यास शहरात पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे तातडीने भूमिगत गटार योजनेचा विषय मार्गी लावण्याची गरज होती. मात्र नगराध्यक्षांना याचे गांर्भिय नसल्याचा आरोप करीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व बसपाचे सदस्य आक्रमक झाले. त्यामुळे सभागृहात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर सदस्यांची आक्रमकता पाहता अध्यक्षांनी पुन्हा आठ दिवसांनी विशेष सभा बोलावून त्यात हा विषय ठेवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सदस्य शांत झाले. त्यानंतर काही सदस्यांनी मागील सभा का तहकूब करण्यात आली, त्यामागील नेमके कारण असा प्रश्न उपस्थित करुन अध्यक्षांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सभेत मागील विषयांवर चर्चा करण्यात आली.भीमघाटाला तीर्थस्थळाचा दर्जाशहरातील भीम घाट परिसराला तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात यावा. हा विषय अध्यक्षांच्या सहमतीने सदस्य विनित शहारे यांनी ठेवला. त्यानंतर सभागृहाने एकमताने भीमघाटला तीर्थस्थळाचा दर्जा देण्याचा ठरावाला एकमताने मंजुरी दिली. त्यामुळे या परिसराच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.सभेकरिता चोख पोलीस बंदोबस्तबुधवारी आयोजित नगर परिषदेची सर्वसाधारण सभा वादळी होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मागील सभेत काही भाजपाचे सदस्य सुध्दा आक्रमक झाले होते. तर विरोधक सुध्दा आक्रमक होण्याची शक्यता लक्षात सभेदरम्यान नगर परिषदेत चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.