शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

गाडगेबाबांचा आदर्श जीवन फुलविणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2017 00:31 IST

निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी अव्याहतपणे दिन दुबळ्यांची सेवा करून कर्मकांडावर प्रहार केला. अंधश्रध्देच्या आहारी जाऊ नका.

भाग्यवान फुल्लुके : गाडगेबाबा जयंती समारंभ उत्साहात बोंडगावदेवी : निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी अव्याहतपणे दिन दुबळ्यांची सेवा करून कर्मकांडावर प्रहार केला. अंधश्रध्देच्या आहारी जाऊ नका. मुलाबाळांना शिक्षित करा, देवाचे रुप गोरगरीबांमध्ये पाहा. आपले गाव निटनेटके स्वच्छ ठेवा, असा मार्मिक हितोपदेश आपल्या रसाळ कीर्तनातून संत गाडगेबाबा यांने दिला. कीर्तनातून साध्या भोळ्या अडाणी समाजाला जागृत करण्याचे काम करीत तळागाळातील सामान्य माणसांचे जीवन फुलविण्याचे काम गाडगे बाबांनी केले, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते भाग्यवान फुल्लुके यांनी केले. आनंद बुध्द विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती युवा संघाच्या वतीने आयोजित संत गाडगेबाबा जयंतीदिनी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच मयाराम रामटेके, प्रमुख अतिथी म्हणून भाग्यवान फुल्लुके, कुंडलिक भैसारे, नंदलाल बोरकर, वामन रामटेके, धन्नु वालदे, अशोक रामटेके, संतोष टेंभूर्णे, वर्षा लोणारे, कविता टेंभूर्णे, ललीता रामटेके, अमर ठवरे, नितीन रामटेके उपस्थित होते. संचालन आरिफ वालदे, प्रास्ताविक गौतम रामटेके तर आभार विश्वास लोणारे यांनी मानले. कार्यक्रमाला महिला, पुरूष उपस्थित होते. ग्रामपंचायत कार्यालय स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कर्मयोगी संत गाडगेबाबा महाराज यांनी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गाडगेबाबाच्या पुतळ्याला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी गावचे सरपंच राधेश्याम झोळे, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष तुळसीदास बोरकर, वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष शामकांत नेवारे, परीवेक्षक एम.एम.धुर्वे, माधोराव पुस्तोडे, प्राथमिक आरोग्य विभागाचे डॉ. कुंदन कुळसुंगे, नित्यानंद पालीवाल, नरेद्र बनपूरकर, बरैय्या, धनंजय बनपूरकर व ग्रामसेवक एल.एन.ब्राम्हणकर, किशोर सहारे, राष्ट्रपाल ठवरे व आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. (वार्ताहर)